Next
मला वाटतं...
रेणू दांडेकर
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


शाळा आणि पाऊस साधारण एकाचवेळी सुरू होतं. सध्या बाहेर सगळं ओलं वातावरण असेल म्हणून बैठे खेळ खेळूया.
चला गोलात बसूया. गोल केल्यावर आपल्यापैकी एक जण एक वाक्य सांगेल. ते वाक्य अर्धंच असेल. उदाहरणार्थ – ‘पाऊस पडला की मला वाटतं...’ मग प्रत्येक जण हे वाक्य पूर्ण करेल. शक्य असेल तर हा खेळ खेळताना आपण वही घेऊन बसू. पानावर ज्यानं अर्ध वाक्य सांगितलं असेल, ते लिहू. मग प्रत्येक जण जे वाक्य सांगेल ते लिहू. सगळ्यांची पाळी झाली की पुन्हा जर कुणाला काही सुचत असेल तर संधी देणार आहोत. मधेअधे नाही तर ओळीनंच ही संधी मिळेल. म्हणजे गोंधळ होणार नाही.
हाच खेळ दुसऱ्या प्रकारे खेळता येईल. एक जण वाक्य अर्धंच सांगेल. उदाहरणार्थ – ‘मला वाटतं एक दिवस...’ त्याच्या शेजारचा हे वाक्य पूर्ण करेल. म्हणजे एक-दोन-एक-दोन असं सुरू होईल. याच्या उलट दिशेनंही खेळता येईल. म्हणजे नंतरचं वाक्य आधी सांगायचं. उदाहरणार्थ, ‘... म्हणून मला खूप आनंद झाला.’ दुसरा मुलगा/मुलगी पहिलं वाक्य पूर्ण करेल. उदाहरणार्थ –‘पाऊस पडला म्हणून मला आनंद झाला.’ गोलात बसल्यावर एक-दोन-एक-दोन असं करून जोड्या पाडाव्या. एक नंबरचा मुलगा/मुलगी अपूर्ण वाक्य सांगेल, दोन नंबरचा मुलगा/मुलगी नंतरचं वाक्य सांगेल व एक नंबरचा मुलगा/मुलगी आधीचं वाक्य सांगेल.
या सगळ्याची नोंद वहीत ठेवली आणि नंतर स्वतंत्रपणे वाचली की खूप मजा येते. कितीतरी प्रकारची वाक्यं जमा होतात. आपली कल्पनाशक्ती पणाला लागते. इतरांच्या कल्पना समजतात. नंतर जमा झालेल्या वाक्यांचा खजिना ऐकताना मजा येते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link