Next
ड्रम
- मोहन कान्हेरे
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

हे एक अगदी साधं, कवायतीसाठी वापरलं जाणारं वाद्य तुम्हा मुलांच्या ओळखीचं आहे. भारतीय लोकसंगीतात लोकनृत्याच्या वेळी वाजवला जाणारा ढोल आणि ड्रम यांत फारसा फरक नाही. (मात्र लक्षात घ्या, ढोल, ढोलक आणि ढोलकी ही तीन वेगवेगळी वाद्यं आहेत.) ड्रम बीट, अर्थात ड्रमवरचा ठेका! आवाज खूप मोठा असल्यामुळे कवायतीसाठी असलेल्या वाद्यवृंदाला, त्याचप्रमाणे मैदानातील सर्वांना ड्रम स्पष्टपणे ऐकू येतो. To drum a thing into one’s ear or head अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, हे तुम्ही जाणता.
ड्रमच्या ठेक्यावर सामुहिक बासरीवादन करून देशभक्तीपर गीत वाजवलं जातं. बिगुल वादनाची किंवा बँड वादनाचीही योजना या वाद्यावर करता येते. धातूच्या मजबूत जाड गोलाकार रिंगला दोन्ही बाजूंना जाड प्लास्टिक (खास बनवलेलं) जोडलेलं असतं. ते ताणता यावं म्हणून थोड्या थोड्या अंतरावर धातूचे रॉड जोडलेले असतात. हातात लाकडी दांडुका (ज्याला टोकाला कॅनव्हाससारखं आवरण असतं), तो हातात धरून, त्या प्लास्टिक आवरणावर आघात केला जातो. क्वचित कधी दोन्ही हातांत एकेक दंडुका धरून दोन्ही बाजूंना ड्रम वाजवला जातो. जॅझ संगीतात ड्रमकिटचा (ड्रम्सचा सेट) वापर करतात, ज्यामुळे परिणाम चांगला मिळतो.
पूर्वीच्या काळी राजाचं आगमन सूचित करण्यासाठी ड्रमचं वादन करत. (पाश्चात्त्य देशांत, जिथे राजेशाही अस्तित्वात होती, तिथे!) आपल्या देशात शिवकालात हेच  काम तुतारी करत असे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link