Next
चिपळी (चिपळ्या)
- मोहन कान्हेरे
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

साधारणपणे कीर्तनकारांच्या हातात किंवा पौराणिक नाटक-चित्रपटांत, नारदमुनींच्या हातात चिपळ्या पाहायला मिळतात. एक छोटं पारंपरिक तालवाद्य असं याचं वर्णन करता येईल. या वाद्यात लाकूड आणि पातळ झांजा एकत्रितपणे दिसतात. हाताच्या बोटांत धरून वाजवण्याचं हे घनवाद्य महाराष्ट्रात संतांनी उपयोगात आणलं आहे. समाजाला मार्ग दाखवायचा, हरिभक्तीचा प्रचार करायचा आणि तोही गायनाच्या माध्यामतून! अशा वेळी स्वतःच गाणं वा अभंग म्हणायचा आणि चिपळ्यांवर ठेका धरायचा. चिपळीचे दोन भाग असतात. जो थोडा जाडसर असतो तो अंगठ्यात अडकवतात व दुसऱ्या भागात बाकीची चार बोटे सरकवतात. एकमेकांवर हलका आघात करून, समेवर आणि अन्य काही तालांच्या मात्रांवर ठेका धरला जातो. त्यावेळी पातळ झांजांचा नाजूक ध्वनी प्राप्त होतो आणि तबला वा मृदुंगाला उत्तम जोड मिळते. पूर्वीच्या काळातील कीर्तनकार गाताना माफक नर्तनही करीत असत. त्यावेळी स्वतःभोवती गिरकी घेत ते अभंग गात. हरिनामाचा गजर करत. अशा वेळी चिपळ्यांचा कौशल्यानं वापर होत असे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link