Next
आठवणी
- मंगल विलास कांगणे कल्याण (प.)
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

अजूनही छळतो क्षण तो विरहाचा मला
रोज का भासतो विरह तुझा तो नवा मला
का सतावतो आठवून सदा तू मला
तुझ्यातच का गुंतला जीव हा बावरा माझा
नको विसरू तू मला, असे म्हणेन का मी तुला?
तुझ्या संगतीच्या क्षणांचा, मी आठवूनी घेते झुला
झुला घेते अलगद जरा ओथंबून येती हे नयन
शिरशिरी अंगी येती, तेव्हा आठवणींत तू बंधन
नको वाटतो हा एकांत जीवघेणा माझा मला
सोबत हवा तू किंवा तुझ्या आठवणींचा मेळा
कधीच न दूर जावे तू माझ्यापासून सजणा
तुझ्यासाठीच असेन मी उभी आठवणींच्या अंगणा
अंगणी असावा तू आणि मी, प्रसन्न असावा तो देखावा
दु:खाला ना थारा, आठवणींचा झरा सतत वाहावा
नको त्या आठवणी नुसत्या, तू असावा समीप सदा
नको विरह मला तुझा, तुझी असावी नेहमी नवी अदा

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link