Next
हसाहसवा
पुरुषोत्तम अत्रे
Friday, May 31 | 01:45 PM
15 0 0
Share this story

हिअर हिअर


अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये शेरडीन नावाचा एक लेखक, राजकारणी होऊन गेला. इंग्लंडच्या संसदेमध्ये त्याने प्रभावी वक्ता म्हणून आपली छाप पाडली. त्या काळात त्या सभागृहात एक आगाऊ सभासद होता. कोणीही बोलत असेल तर दर दोन वाक्यांनंतर तो Hear Hear असं म्हणून व्यत्यय आणत असे.
एकदा असेच एका सभासदाचे भाषण सुरू होते. तो आगाऊ सभासद म्हणाला, “Hear Hear!”
शेरडीन पटकन उभा राहिला आणि म्हणाला, “या माणसापेक्षा मूर्ख माणूस आपल्याला कोठे आढळेल बरे?”
तो आगाऊ सभासद सवयीने पटकन बोलून गेला, “Hear Hear!”
सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
कारण लोकांना, शेरडीनच्या ‘कोठे’ शब्दामुळे आगाऊ सभासदाच्या Hear Hear चा अर्थ Here Here असा लागला.
.....................................................................

...दुसरा नाही!


आचार्य प्र. के. अत्रे आणि मामा वरेरकर या दोन महान नाटककारांमध्ये वाङ्मयीन वाद होते. त्यातून ते एकमेकांवर टीका करत. एकदा एका कार्यक्रमात दोघे एका मंचावर आले.
आता हे दोघे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती.
आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले. मामांकडे पाहत म्हणाले, “मामा वरेरकरांसारखा नाटककार आजच्या घडीला दुसरा नाही!”
श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मामांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. एक दीर्घ श्वास घेऊन अत्रे पुढे म्हणाले, “असे त्यांचे स्वत:चे मत आहे!”
......................................................................

भीती


पावसाळ्याचे दिवस होते. सकाळी नेहमीच्या रस्त्यावर इमारत कोसळल्याने तो मार्ग बंद झाला होता. त्यामुळे कामावरून परतताना स्मशानभूमीशेजारच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो. दोघे जण अचानक आडवे आले. लुटारूच दिसत होते. टिंगलीच्या स्वरात मला म्हणाले, “एवढ्या रात्री... तोही एकटाच... भीती नाही वाटत का रे? भलताच डेअरिंगबाज दिसतोयस...”
मी आधी घाबरलेला होतोच. त्यांना पाहून आणखी घाबरलो, पण तसे न दाखवता म्हणालो, “जिवंत होतो ना... तेव्हा खूप भ्यायचो.”
पाठीला पाय लावून पळाले दोघे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link