Next
नोकरी शोधताय
विशेष प्रतिनिधी
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story

‘डीआरडीओ’मध्ये संधी

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे ‘डीआरडीओ’तर्फे विविध पदांसाठी रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५ ऑक्टोबर २०१९

पदांची नावे व संख्या-

स्टेनोग्राफर- १३ पदे, क्लार्क- ३ पदे, फायर इंजिन ड्रायव्हर- ६ पदे, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट- ५८ पदे, स्टोअर असिस्टंट- ३२ पदे, सिक्युरिटी असिस्टंट- २३ पदे, फायरमन- २० पदे.

पात्रतेचे निकष - प्रत्येक पदासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे असून त्याचा संक्षिप्त गोषवारा पुढे दिला आहे.

स्टेनोग्राफर - उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून १२ वी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचा इंग्रजी टंकलेखनाचा वेग (English Typing Speed) ८० शब्द प्रतिमिनिट असला पाहिजे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८-२७ वर्षे असावे.

क्लार्क - उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून १० वी (१०+२ या पद्धतीनुसार) उत्तीर्ण झालेला असावा. त्याचा इंग्रजी टंकलेखनाचा वेग (English Typing Speed) ३० शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाचा वेग (Hindi Typing Speed) प्रतिमिनिट २५ शब्द असला पाहिजे. त्याला कोणत्याही सरकारी/निमसरकारी/स्वायत्त संस्थेत कॅन्टिन मॅनेजमेंटचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८-२७ वर्षे असावे.

फायर इंजिन ड्रायव्हर- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून १० वी उत्तीर्ण झालेला असावा. त्याच्याकडे दुचाकी किंवा तीनचाकी व हलके व अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना (Valid Driving Licence) असावा. तो शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८-२७ वर्षे असावे.

उरलेल्या इतर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून १२ वी उत्तीर्ण झालेला असावेत.

निवडप्रक्रिया- पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड Tier–I (CBT) and Tier-II (Trade/Skill/Physical Fitness and Capability Test, wherever applicable) यांच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा कराल?

पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम डीआरडीओच्या https://www.drdo.gov.in/drdo/ceptam/ceptamnoticeboard.html या अधिकृत संकेस्थळाला भेट देऊन तिथे स्वत:ची नोंदणी करावी. या नोंदणीनंतर उमेदवाराला मिळालेला user ID आणि password पुढील लॉगइन करण्यासाठी जपून ठेवावा. त्यानंतर लॉगइन करून दिलेल्या सूचनांनुसार अर्ज अचूक व पूर्ण भरावा. आवश्यक ती कागदपत्रे, फोटो इत्यादी बाबी अपलोड करून अर्जाचे शुल्क भरावे व शेवटी submit करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

अर्जाचे शुल्क- या पदांच्या अर्जासाठी १०० रुपये शुल्क असून एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/इएसएम आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link