Next
झाशीची राणी
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, May 31 | 01:45 PM
15 0 0
Share this story

१८५३ मध्ये दत्तक विधान अमान्य करून इंग्रजांनी झाशीचे संस्थान खालसा केले. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रज अधिकाऱ्याला ठणकावले, ‘’मेरी झाँसी नही दूँगी!’
१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात मीरत, दिल्लीबरोबर झाशीही इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाली. इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज याने झाशीजवळ आपल्या सैन्याचा तळ ठोकला. त्याने लक्ष्मीबाईंना शरण येण्यास फर्मावले. मात्र राणीने शरणागती पत्करली नाही. त्यांनी झाशीचे रक्षण करण्याची सिद्धता केली. झाशीच्या तोफांनी इंग्रजांची दाणादाण उडवली. इंग्रज सैन्याने फितुरीचा अवलंब करून झाशीत प्रवेश केला. राणी रात्री निवडक २०० स्वारांनिशी आपल्या १२ वर्षांच्या दत्तक पुत्र दामोदरला पाठीशी बांधून किल्ल्याबाहेर पडली. इंग्रजांचा पहारा तोडून, २४ तास घोड्यावरची दौड मारून काल्पीमध्ये पोहोचली. ह्यू रोजने काल्पीवर हल्ला चढवला. लक्ष्मीबाई यांनी केलेल्या हल्ल्याने इंग्रजी सैन्याची पिछेहाट झाली, पण ह्यू रोजने आणलेल्या नव्या दमाच्या सैन्यामुळे काल्पी इंग्रजांनी जिंकली.
राणी लक्ष्मीबाई यांनी पेशव्यांसाठी ग्वाल्हेर जिंकल्यावर ह्यू रोज आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरला भिडला. ग्वाल्हेरच्या लढाईत लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली.
इंग्रजांनी ग्वाल्हेरवर पुन्हा सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला. राणी लक्ष्मीबाई शत्रूची फळी फोडून बाहेर गेल्या पण समोर आलेल्या ओढ्यापाशी त्यांचा नवीन घोडा अडला. राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांबरोबर लढताना वीरमरण आले. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना शतश: प्रणाम.
झाशीच्या राणीबद्दल प्रसिद्ध हिंदी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांची “खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी!” ही कविता अवश्य वाचा किंवा यु-ट्यूब वर बघा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link