Next
अॅप्लिकेशन फॉर…
पुष्कर सामंत
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

युवकांना नोकरी-व्यवसायाच्या संधी शोधणं सोपं व्हावंं यासाठी
‘झी मराठी दिशा’नं या अंकापासून सुरू केलंय ‘नोकरी शोधताय?’ हे खास सदर.


नोकरी मिळवण्यासाठी अंगी कौशल्य असणं साहजिकच आहे. परंतु तेवढ्यावरच भागत नाही. नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये स्वतःच्या अंगी असणारी ही कौशल्यं समोरच्याला उपयोगी येणारी आहेत हे पटवून द्यावं लागतं. इतकंच नाही तर तसा विश्वास समोरच्याला द्यायचा असतो. मुळातच नोकरी मिळवणं ही एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. सर्वात पहिला टप्पा म्हणजे अर्ज करणे. अर्ज करण्याआधी काही गोष्टींवर विचार केला पाहिजे.

कोणत्या प्रकारची नोकरी हवी?
नवीन नोकरी निवडायची असो किंवा नोकरी बदलायची असो  (ज्याला लॅटरल मूव्ह म्हणतात) तीन गोष्टींचा विचार नेहमीच करावा लागतो. पहिली म्हणजे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. आपल्याला काय करायचंय आणि काय नाही हे डोक्यात पक्कं असेल, तर करिअर निश्चित करण्यात फारशी अडचण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला हवं असलेलं पद मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं. स्वतःच्या अंगी असणाऱ्या कौशल्यांचा पुरेपूर वापर जर का होणार असेल, अशाच कंपन्यांचा विचार केला गेला पाहिजे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार आणि इतर सुविधा. तुमच्या आवश्यक गरजा भागवण्यासोबतच गुंतवणुकीसाठी किती रक्कम आवश्यक आहे, याचं गणित ज्याचं त्यानं मांडायचं असतं.  यानंतर येतो तो मुद्दा म्हणजे अर्ज करण्यासाठी करावा लागणारा रिसर्च. याबाबत जाणून घेउया पुढील भागात.


नोकरी शोधताय?
‘बीएसएफ’मध्ये सुसंधी
बीएसएफ म्हणजेच ‘सीमा सुरक्षादल’मध्ये हेड कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण १०७२ जागांपैकी ३०० जागा हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) व ७७२ जागा हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या पदांमध्ये विभागण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार केवळ ऑनलाइन प्रक्रियेनेच अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्जाची सुरुवात - १४ मे २०१९ पासून
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम संधी - १२ जून २०१९
पात्रतेचे निकष :
शैक्षणिक अर्हता : सरकारमान्य बोर्डातून दहावी (मेट्रिक्युलेशन)/ बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील दोन वर्षे आयटीआयचे प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे (राखीव जागांसाठी नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सवलत)
निवडप्रक्रिया :
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व अंतिम वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्जासोबत भरावयाचे शुल्क : एससी/एसटी, महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
सर्वसाधारण व ओबीसी यांच्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

‘आयआयसीए’मध्ये प्रोफेसर व्हा!
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’तर्फे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व इतर अशा पाच पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०१९ आहे.
पदसंख्या : प्रोफेसर : ०१ असोसिएट प्रोफेसर : ०१          असिस्टंट प्रोफेसर : ०३
पात्रतेचे निकष व शैक्षणिक अर्हता : प्रोफेसर या पदासाठी- संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ५५% गुणांसह पीएच.डी. व १० वर्षांचा अनुभव.
असोसिएट प्रोफेसर या पदासाठी-
संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ५५% गुणांसह पीएच.डी. व ८ वर्षांचा अनुभव.
असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी-
संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ५५% गुणांसह पीएच.डी. व ३ वर्षांचा अनुभव.
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : https://iica.nic.in/oportunities.aspx

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link