Next
धीरगंभीर सरोद
मोहन कान्हेरे
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


सतारीच्या इतकेच सरोद हेही एक लोकप्रिय वाद्य आहे. सतारवादक संख्येने जास्त आहेत. ही दोन्ही वाद्ये जुगलबंदीच्या दृष्टीने एकदुसऱ्याला अत्यंत पूरक आहेत, जवळची आहेत.
सतारीच्या तुलनेत सरोदचा ध्वनी धीरगंभीर आहे. या ध्वनीला खानदानी रुबाब आहे. श्रोत्यांची पटकन श्रवण-समाधी लागेल, असे काही या वाद्याच्या निनादात नक्कीच आपल्याला जाणवते. पं. रविशंकर (सतार) आणि उ. अली अकबर खाँ (सरोद) या दोन कलाकारांनी एकत्रितपणे जुगलबंदीचे रसिले कार्यक्रम सदर करून देशविदेशांत ही दोन्ही वाद्ये कमालीची लोकप्रिय केली आहेत. यमन, बागेश्री यांसारखे विस्तारक्षम राग, अनेकानेक अंगानी फुलवून, त्यांतील सौंदर्याची अनुभूती या दोन उच्च कोटीच्या कलावंतांनी श्रोत्यांना अनेक मैफिलींतून दिली आहे. हल्लीच्या काळात सरोदवादन म्हटले की पहिले नाव येते ते उ. अमजद अली खान यांचे! त्यांच्या वादनातील आलापी, तिचे घनगंभीर सूर श्रोत्याला वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात. त्यांचा सायंकालीन राग ‘श्री’ हे पटकन आठवणारे उदाहरण आहे. बहुधा ‘श्री’ रागावर त्यांचे विशेष प्रेम आहे. हा राग सादर करणारी एल.पी. (लाँग प्लेइंग) रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे.
सरोदवादन सदर करताना त्या त्या रागाची महत्ता श्रोत्याला जाणवून देणे, आलाप-जोड-झाला पद्धतीने रागविस्तार करणे, ताल-क्रीडा, तीदेखील उपज अंगाने करणे, हे सर्व कलावंत मंडळी करतातच, खेरीज स्वतःचे विचार-चिंतन ते मांडतात, म्हणून श्रोते आनंदित होताना दिसतात. कुठल्याही मैफिलीचे हेच तर वैशिट्य आहे!
सरोद या वाद्याचा इतिहास, जडणघडण, अनेकानेक कलाकारांची उज्ज्वल कामगिरी इत्यादींचा परामर्श पुढील भागात घेऊ.    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link