Next
अर्थ एक, शब्द अनेक
रेणू दांडेकर
Friday, September 27 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मित्रांनो, कधी कधी शब्द दोन असतात, पण त्यांचा अर्थ एकच असतो. एकच अर्थ असणारे तीन वा चार शब्दही असतात. उदाहरणार्थ, ‘आई’ हा शब्द. या शब्दाला माय, माता, जननी असे तीन शब्द आहेत. कुणी आई म्हणतात, कुणी माय म्हणतात. कुणी माता म्हणतात का? जननी शब्द आपण वापरतो का? पण हे शब्द कवितेत आढळतात. ही गंमत आपण समजून घेऊ. त्यासाठी पुढे काही परिच्छेद दिले आहेत. शोधा बरं त्यातील सारखे अर्थ असणारे शब्द!
*    आई म्हणाली, “फुलांचा सुगंध जिकडेतिकडे पसरलाय.” बागेत फुलंच फुलं होती. जिकडेतिकडे फुलांचा सुवास येत होता. आजी म्हणाली, “फुलांचा परिमल किती छान वाटतोय.”
*    आम्ही फिरत होतो. कुणीतरी आम्हाला भटकत असताना पाहिलं. “पोरांनो, कुठे चाललात?” सर म्हणाले. “मुलांना सांगा त्यांना कुठे चाललात ते! गड, किल्ले पाहायला निघालोय. किती मजा. किती गंमतच.”
*    आकाशात फुग्यांचा गुच्छ होता. त्यांचे रंग तऱ्हेतऱ्हेचे होते. वेगवेगळे रंग छान दिसत होते. रंगीबेरंगी फुगे पाहून वाटलं किती सुंदर दिसताहेत हे!
*    हळूच या. सावकाश या. आवाज करू नका. सगळे जागे होतील. घाई कराल, गडबड कराल तर पडाल.
*    पाऊस पडू लागला. ढग गडगडू लागले. पावसाच्या सरी कोसळू लागल्या. झाडं चिंब भिजली, ओली कच्च झाली. मुलांना खूप आनंद झाला. मुलं म्हणू लागली, ‘जिकडे तिकडे मोद भरे, आनंदी आनंद गडे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link