Next
आमचे आधारवड
डॉ. प्राजक्ता महाले-राजपूत
Friday, May 03 | 03:30 PM
15 0 0
Share this story


आज माझ्या नावापुढे ‘डॉक्टर’ची पदवी लागली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळे, ज्यांना आम्ही आणि आमची मुले ‘नाना’ म्हणतो. आज सरकार ‘बेटी पढाओ’ ही मोहीम राबवत आहे, परंतु माझ्या बाबांनी २० वर्षांपूर्वीच मला उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेऊन ही मोहीम अमलात आणली आहे.
माझे माहेर धुळे जिल्ह्यातले आहे. आमच्या समाजात, त्यातही धुळे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणाबद्दल फारशी आस्था नव्हती. माझे वडील हे एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक होते. मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाबद्दल घरात चर्चा सुरू झाली. मला पुणे येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला तेव्हा आई व आजी यांचा विरोध असतानाही वडिलांचा माझ्यावर व त्यांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांवर विश्वास असल्याने मला पुण्याला हॉस्टेलमध्ये प्रवेश घेता आला. मी बाबांचा विश्वास सार्थ ठरवल्यामुळे आमच्या समाजातील अनेक मुलींनादेखील उच्चशिक्षण घेता आले. माझ्या बाबांनी अतिशय गरिबीतून व कष्टातून, कुणाचेही मार्गदर्शन नसताना शिक्षण पूर्ण केले. आम्हा तिन्ही भावंडांच्या जन्मानंतर त्यांनी त्यांची पीएचडी मिळवली. आज ते एका नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या वयातही ते अखंड काम करतात. ते फार कमी बोलतात. कमी बोलून जास्त काम करणे त्यांना आवडते. त्यांच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी आज चांगल्या पदांवर काम करत आहेत. ‘आधी केले मग सांगितले’ अशी त्यांची कामाची पद्धत आहे. माझ्या उच्चशिक्षणाच्या प्रवेशामागील हेच कारण आहे.  त्यांचे म्हणणे होते, की आपण दुसऱ्यांना सल्ले देतो मुलींना शिकवा आणि जर मीच माझ्या मुलींना शिकवले नाही तर मला दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार कसा राहील! अशा आमच्या बाबांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना! n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link