Next
विरुद्ध अर्थाच्या शब्दजोड्या
- रेणू दांडेकर
Friday, August 30 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पुढे चार परिच्छेद दिले आहेत. त्यात असे काही शब्द लपले आहेत की त्या शब्दांचा विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द त्याच परिच्छेदात आहे. अशा शब्दजोड्या शोधून काढा व लिहा. नंतर त्या जोड्या वापरून तुम्ही तुमच्या मनातील वेगवेगळी वाक्यं तयार करा-
*    माझी आई म्हणाली, “लवकर ये.” बाबा म्हणाले, “उशिरा आलीस तरी चालेल.” मला कळतच नव्हतं काय करावं? एवढंच कळत होतं की शांत बसावं. पण शांत कसं बसणार? सगळे जण दंगा करत होते. मी विचार करू लागले. आई म्हणाली, “उशिरा यायचा अविचार करू नकोस. मला भीती वाटते.” बाबा आईला म्हणाले, “भीती कसली? ती धीट आहे.”
*    कोल्हापुरात अतिवृष्टी नि मराठवाड्यात दुष्काळ. एकीकडे पाणीच पाणी आहे, तर दुसरीकडे पाण्याचा थेंबही नाही. जिथे पाऊस आहे तिथे आता पाणी साठून मृत्यू, मरण पाहावं लागतंय. खरं तर पाणी म्हणजे जीवन. एका प्रांतात पाऊस वेगानं वाढतोय, तर दुसरीकडे हळूहळू कमी होतोय.
*    काही मुलांची शाळा आवडती तर काहींची नावडती. काही मुलं मध्येच उभी राहतात, काही बसतात. शिक्षकांची वर्गात ये-जा सुरू असते. काळा फळा खडूनं पांढरा होऊन जातो. सकाळी उघडलेली शाळा संध्याकाळी बंद होते.
*    बागेतल्या झाडांची जुनी पानं गळाली. झाडांना नवीन पालवी फुटली. मरगळलेली बाग टवटवीत दिसू लागली. काही झाडं उंच होती, काही झाडं बुटकी. दु:खी झालेले आनंदी झाले. बागेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत झाडेच झाडे होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link