Next
कैरी आणि पडवळाच्या बियांची चटणी
वसुधा गवांदे
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कैरी आणि पडवळाच्या बियांची चटणी ही एक वेगळी पण तितकीच चविष्ट चटणी कशी करायची, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही चटणी खेड्यापाड्यांत बायका करतात. शहरात मात्र ही चटणी फारशी कुणाला माहीत नाही.
या चटणीसाठी एक मध्यम आकाराची कैरी घ्या. कैरी जर खूप आंबट असेल तर दोन फोडींचा कीस काढून घ्या. पडवळाच्या बियांचे दोरे काढून घ्या. कढईत तेल गरम करून मंद आचेवर पडवळाच्या बिया परतवून घ्या. थंड झाल्या की त्यात पाव वाटी भाजलेले शेंगदाणे किंवा पांढरे तीळ, एक हिरवी मिरची, चवीपुरते मीठ, थोडीशी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता हे साहित्य वाटून घ्या. त्यावर कैरीचा कीस घाला. जर कैरीचा कीस नको असेल तर कैरीच्या बारीक फोडी करून त्याही वरील मिश्रणाबरोबर वाटून घ्या. आता हे सगळं साहित्य एकजीव करून त्यावर हिंग, हळद व मोहरीची फोडणी करून घाला. झाली चटणी तयार. पडवळाच्या बियांत कैरी घालून केलेली ही चटणी खूपच चविष्ट लागते आणि फ्रीजमध्ये चांगली टिकते. तेव्हा ही वेगळ्या प्रकारची चटणी जरून करून बघा. 


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link