Next
गर्भसंस्कार कशासाठी?
गजानन केळकर
Friday, January 18 | 03:00 PM
15 0 0
Share this storyमूल आईच्या पोटात असताना त्यावर संस्कार होऊ शकतात का, की गर्भसंस्कार आजच्या युगातले फॅड आहे? काही लोकांना गर्भसंस्कार अतिशय आवश्यक वाटतात, तर काहींना ‘त्यात काही अर्थ नाही’ असे वाटते. अशा अतिशय परस्परविरोधी भूमिका ऐकल्यामुळे होऊ घातलेला पालक भांबवून जातो. त्यातच त्याच्या कानावर त्याच्याच परिचयातल्या लोकांचे, ज्यांनी आपल्या मुलांसाठी गर्भसंस्कार केले त्यांचे, चांगले अनुभवही येत असतात. गर्भसंस्कारित मुले ही इतर मुलांपेक्षा शांत असतात, समजुतदार असतात, हुशार असतात, प्रेमळ असतात. मग आपण आपल्या मुलाबाबत काय करावे याबाबत पालकांचा संभ्रम होतो. काही पालक तर ‘गर्भसंस्कार केल्याने वाईट तर होणार नाही’ असा दृष्टिकोन पत्करतात.

या संभ्रमातून मार्ग काढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) याबाबत मत समजून घेणे आवश्यक ठरते. बाळ जन्माला येण्याच्या पद्धतीबद्दल जागतिक आरोग्य संघटना म्हणते, की Pregnancy & Child Birth as a Bio-Psycho-Social Event. म्हणजे गर्भधारणा आणि प्रसूती ही जैविक-मानसिक-सामाजिक प्रक्रिया आहे. या तीनही गोष्टींचा प्रभाव येणाऱ्या जिवावर पडत असतो. प्रत्यक्षात काय घडते? सध्याची पद्धत फक्त जैविक प्रक्रियेपर्यंतच थांबली आहे. मानसिक व सामाजिक हे टप्पे विचारात घेतलेच जात नाहीत. चांगले अपत्य होण्यासाठी मातेच्या फक्त शारीरिक गोष्टींचा विचार केला जातो. आहार, औषध, व्यायाम इत्यादी, पण तिचा स्वभाव कसा असावा, वागणूक कशी असावी, मन शांत कसे ठेवावे, कुठले साहित्य वाचावे, टीव्हीवरील कोणत्या गोष्टी पाहू नयेत, कुठले संगीत ऐकावे, याचा विचार किती केला जातो?

गर्भसंस्कार आणि लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंदांचे मनशक्ती प्रयोगकेंद्र हे समीकरण आता पक्के झाले आहे. कारण गर्भसंस्काराचा कार्यक्रम सुमारे साठ वर्षांहून अधिक काळ राबवणारी ही भारतातली एकमेव संस्था निरपेक्षपणे तिच्या साधकांमार्फत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हे काम करत आहे. मनशक्तीमधील गर्भसंस्कार या संकल्पनेचा उद्देश केवळ त्या कुटुंबाला सुसंस्कारित अपत्यलाभ होणे एवढाच नसून त्यामुळे समाजामधल्या तिन्ही पिढ्यांत सकारात्मक बदल होणे हा आहे. कुटुंबामध्ये एका सुंदर बाळाच्या आगमनाने हा बदल होऊ शकतो. मनशक्तीच्या या सामाजिक परिवर्तनाच्या उपक्रमात सर्व स्तरातील आणि जाती-धर्मातील जोडपी भाग घेतात. हा उपक्रम विनामूल्य व समूल्य पद्धतीने अतिशय माफक खर्चात राबवला जातो. केवळ गेल्या दहा वर्षांत सुमारे सव्वा लाख गर्भधारी जोडप्यांनी त्यात भाग घेतला आहे. यामध्ये एक दिवसीय कार्यशाळा, तीन दिवसांचे अभ्यास वर्ग, इलेक्ट्रॉनिक मशीन चाचण्या इत्यादी अनेक गोष्टी आहेत.

गर्भाच्या भावविश्वासंबंधीचे हे संशोधन सर्वांसमोर विशेषत: डॉक्टरांसमोर आणण्याची संधी मनशक्ती प्रयोगकेंद्राने दिली आहे. या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद १८ ते २० जानेवारी या कालावधीत मनशक्ती केंद्र व अमेरिकेतील अपाह (APPPAH - Association for Prenatal & Perinatal Psychology & Health) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या परिषदेची शिफारस भारतीय स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटना (FOGSI) यांनीही केली आहे. सदर परिषद मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा येथे होणार आहे. परिषदेचा विषय आहे - Ancient Wisdom and Modern Science of Prenatal Development- Building a New Healthy World from the Womb. म्हणजेच ‘प्राचीन ज्ञान व आधुनिक विज्ञान’ यांची सांगड घालून नवीन सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे.

आधुनिक संशोधनाची मांडणी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ब्राझील, हॉलंड इत्यादी देशांतले १० संशोधक येत आहेत. शिवाय भारतातील संशोधक, डॉक्टर आहेतच. माहिती/नोंदणीसाठी संकेतस्थळ https://conference.manashakti.org, ९७६३९८६६६१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link