Next
दर्या उसळे असा फुलांचा
- मंजिरी पाटील, सिंहगड रोड, पुणे
Friday, July 12 | 03:00 PM
15 0 0
Share this story

जलधारा या कोसळल्या अन् अंकुरली ही धरा
लगबग करूनी वरती येती तृणपाती सरसरा...
रानफुलांनी गाव सजविले कासपठारावरी
चिमण चिटुकल्या फुलाफुलांनी सजली डोंगरदरी...
नभी तारका जशा चमकती तशी फुले भूवरी
तृणपात्यावर चुरा चांदीचा संमोहन-ओवरी...
खाच-कातळी, डगर-कड्यावर इंद्रधनूच्या छटा
जाता-येता झुळूक उडवते तरूवेलींच्या बटा...
नवरंगांची वस्त्रे लेवून फुले कळ्या मुरकती
सुंदरतेची नशा चढे कीटकांची फिरते मती...
पात्यावरती दंवबिंदुंचे जर्द पोपटी झुले
रानफुलांची जत्रा भरते जागी होता फुले...
दर्या उसळे असा फुलांचा जीव कोण हरखतो
मोरच होतो निळा मनाचा... थिरक थिरक नाचतो...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link