Next
रुपारेलचे अनोखे ‘दर्शन’
सावनी गोगटे
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

अनोळखी भाव काही डोळी दिपावे,
अन् आठवणींच्या कोनाड्यात नकळत त्यास जपावे,
टिपण्याजोगे क्षण स्मित टिपावे
त्या क्षणांचेही दिपवणारे दर्शन घडावे!

  
विविध कलागुण बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलेला वाव  मिळवून देण्यासाठी रुपारेल महाविद्यालय अनेक संधी उपलब्ध करून देते. सांस्कृतिक विभागांतर्गत अनेक  गट रुपारेलमध्ये कार्यरत आहेत. वर्षभरात जेवढे उपक्रम होतात  त्यांची क्षणचित्रे टिपून घेतली जातात. छायाचित्रण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी  संधी मिळावी आणि त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावे या हेतूने या वर्षी विद्यार्थ्यांच्या  प्रयत्नांनी आणि प्राचार्यांच्या प्रोत्साहनाने एक नवीन गट सुरू केला गेला. त्या गटाला ‘दर्शन’ असे नाव देण्यात आले. छायाचित्रकार त्याच्या सर्जनशीलतेने टिपलेल्या दृश्यांचे दर्शन घडवून देत असतो,  म्हणून या विभागाचे नाव ‘दर्शन’ ठेवण्यात आले. छायाचित्रण तसेच ध्वनिचित्रमुद्रण, एडिटिंग, अॅनिमेशन यांसारख्या अनेक गोष्टी या गटाअंतर्गत शिकता येतात. हा गट सर्व रुपारेलकरांसाठी खुला असून  नुकताच ‘दर्शन’ विभागाचा उदघाटनसोहळा अलिकडेच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलरंग कलाकार विकास विनायक पाटणेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले गेले आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली ध्वनिचित्रफीत या कार्यक्रमात दाखवण्यात आली. हे प्रदर्शन संध्याकाळपर्यंत मांडून ठेवण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
पाटणेकर यांनी ‘छायाचित्राचा वापर आणि सर्जनशीलता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तुम्हाला आवडत ते करा, कलेला प्राधान्य द्या, छायाचित्राचा वापर एक साधन म्हणून करा, बुद्धीचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून प्रत्येक वेळेस नवीन, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करा,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. “छायाचित्रकारांसाठीही वाचन महत्त्वाचं आहे,” असेही त्यांनी सांगितले. दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांकडून प्रमुख पाहुणे विकास पाटणेकर यांना प्रतीक्षा तांबे हिने रेखाटलेली त्यांची प्रतिमा भेटवस्तू म्हणून देण्यात आली, तसेच दर्शन विभागाचा बिल्लासुद्धा दिला गेला. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सायली चव्हाण हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सूरज खरटमल याने सर्वांविषयी ऋण व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link