Next
...आठवडानोंदी
Vijay Kuvalekar
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story


 ३ ऑगस्ट : ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे, पत्रीसरकारचे जनक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती (१९००) / हिंदी व मराठी चित्रपटअभिनेत्री शशिकला यांचा ८७ वा वाढदिवस (१९३३) / भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या स्थापनेस ७१ वर्षे पूर्ण (१९४८) / पुणे जिल्ह्यातील राणी लक्ष्मीबाई या महाराष्ट्रातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेस १६ वर्षे पूर्ण (२००३) / स्वाइन फ्लूचा देशात पहिला बळी. पुण्यातील रिदा शेख या शाळकरी मुलीचा मृत्यू (२००९). ४ ऑगस्ट : मराठी कादंबरी, कथालेखक व लघुनिबंधाचे आद्यप्रवर्तक, साहित्यसमीक्षक नारायण सीताराम फडके यांचा जन्मदिन (१८९४) / चतुरस्र गायक किशोरकुमार यांचा ९१वा जन्मदिन (१९२९) / भारतातील मरणोत्तर त्वचादानाची ‘स्किन बँक’ मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू (२००१) / भारतातील अप्सरा अणुभट्टी कार्यान्वित (१९५६) / रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकेतील चतुरस्र कलावंत, लेखक दिलीप प्रभावळकर यांचे ७६ व्या वर्षात पदार्पण (१९४४) / निसर्गअभ्यासक, लेखक श. म. केतकर यांचा स्मृतिदिन / आंतरराष्ट्रीय सद्भावना दिन- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होतो.

 ५ ऑगस्ट : इतिहाससंशोधक, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्मदिन (१८९०) / अणुबॉम्ब निषेधदिन / चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांचा ९०वा जन्मदिन (१९३०) / कथाकार, समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे ८७ व्या वर्षात पदार्पण / ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला ६०वर्षे पूर्ण / गायिका ज्योत्स्ना भोळे यांचा स्मृतिदिन (२००१).

 ६ ऑगस्ट : संगीतसमीक्षक गोपाळकृष्ण भोबे यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / मुंबईतील केइएम रुग्णालयात सर्वार्थाने भारतीय असलेल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म (१९८६). जुलै २०१८ मध्ये या टेस्ट ट्यूब बेबीने एका अर्भकास जन्म दिला. / हिरोशिमा विश्वशांती दिन- अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे किरणोत्सर्गी रोगांचा फैलाव होऊन झालेल्या प्रचंड मनुष्यहानीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्यात येतो / जागतिक रक्ताभिसरणदिन.


 ७ ऑगस्ट : भारतातील विख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन (१९१२) / ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ व ग्रीन ऑस्कर पुरस्कार विजेते डॉ. आनंद दिनकर कर्वे यांचे ८४ व्या वर्षात पदार्पण (१९३६) / पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचे ६५व्या वर्षात पदार्पण (१९५५) / उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ खेड्यांनी हंगामी प्रतिसरकार स्थापत निजामाची सत्ता झुगारून देत स्वातंत्रआंदोलन पुकारले (१९४८).

 ८ ऑगस्ट : अभियंता व जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे ८६व्या वर्षात पदार्पण (१९३४) / भारत छोडोदिन : महात्मा गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश देत इंग्रजांविरूद्ध लढा सुरू ठेवला. (१९४२) / महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय महर्षी स्त्री शिक्षणसंस्थेने पुण्यात सुरू केले. (१९९४) / बेरड हे चरित्र लिहिणारे लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचा दुसरा स्मृतिदिन (२०१७) / जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन / साक्षरतादिन / जागतिक मांजरदिन.

 ९ ऑगस्ट : संगीतसूर्य, अभिनेते केशवराव भोसले यांचा जन्मदिन (१८९०) / मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचा स्मृतिदिन (१९०१) / भावकवी कृ. ब. निकुम्ब यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / ऑगस्ट क्रांतिदिन : या दिवशी इंग्रजांना ‘भारत छोडो’ म्हणणारी चळवळ सुरू झाली (१९४२) / ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास ५१ वर्षे पूर्ण. / आंतरराष्ट्रीय भूमिपुत्रदिन / आंतरराष्ट्रीय आदिवासीदिन / नागासाकीदिन.
संग्राहक : प्रसाद भडसावळे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link