Next
बिभीषण-राम भेट
- अमृता जोशी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

राम-रावण युद्धाच्या वेळी वानरसेना समुद्रकिनारी जमली होती. युद्धासंबंधी विचारविनिमय  करत असताना रावणाचा भाऊ बिभीषण रावणाला सोडून रामाला शरण आला. वानरसेनेतील काहींना वाटले की तो रावणाचा दूत बनून आला असावा किंवा गुप्तचर बनून माहिती काढायला आला असावा. शत्रूच्या भावावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हते. बिभीषणाला बंदी बनवण्याचा विचार सगळे करत होते. रामाने मात्र तो नेमका कशासाठी आला आहे हे बघायचे ठरवले. एक तर राक्षस कितीही बलवान असला तरी लक्ष्मण एकटाही त्यांना मारायला समर्थ आहे हा विश्वास रामाच्या मनात होता. त्यामुळे रामाने शत्रूवरही विश्वास ठेवायचा ठरवला. इतकेच नाही तर त्या दोघांची मैत्री पण ली. या मैत्रीचा उपयोग दोघांनाही झाला. रावणाशी युद्ध करताना बिभीषणाने त्याला खूप मदत केली. युद्ध जिंकण्यासाठी शक्तीबरोबर विश्वास, सामंजस्य या गोष्टींची पण ही गरज असते हेच रामाने दाखवून दिले. धैर्याने वागून परीस्थितीनुसार घेतलेला निर्णय नेहमी फलदायी ठरतो.   रामाला जसा बिभीषणाच्या मैत्रीचा फायदा झाला तसाच बिभीषणलाही झाला. रावणादि राक्षसांचा वध करून सीतेसह राम-लक्ष्मण अयोध्येत परत जात असताना त्यांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. त्याला लंकाधिपती केले. सत्याची साथ देणे नेहमी चांगलेच असते. रावणाची, आपल्या सख्ख्या भावाची साथ सोडून म्हणूनच बिभीषण रामाकडे आला होता.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link