Next
प्रतिसाद
शरद देशपांडे, रूपाली गवळी, मिलिंद कुलकर्णी
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

दीपावली विशेषांक आवडला

‘झी मराठी दिशा’चा दि. ३ नोव्हेंबरचा ‘उत्सव प्रकाशाचा’ हा दीपावली विशेषांक खूप आवडला. या अंकातील प्रत्येक लेख उत्तम असून तो अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला होता.  या अंकातील शि.द. फडणीस यांनी खास दिवाळीनिमित्त रेखाटलेली पान क्र. १३ व २९ वरील व्यंगचित्रे मला खूप आवडली. त्यांची व्यंगचित्रे प्रत्येक अंकात असावीत, अशी विनंती आहे.

शरद देशपांडे, बंगळुरू

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

साहित्यिकांची माहिती देणारे सदर सुरू करावे

मी ‘झी मराठी दिशा’ ची नियमित वाचक आहे. हे आठवडापत्र खूप सुंदर आणि माहितीने परिपूर्ण असे आहे. हे आठवडापत्र मला अतिशय आवडते कारण यात एकही नकारात्मक बातमी नसते. दर्जेदार साहित्याने भरलेले हे आठवडापत्र मला खूप समृद्ध करत आहे. कदाचित काही वर्षांआधी हे आठवडापत्र आले असते तर आतापर्यंत खूप जास्त ज्ञान प्राप्त मला मिळाले असते. परंतु आता आहे, हेही नसे थोडके. दर अंकगणिक माझ्या ज्ञानात भर पडत आहे. या आठवडापत्रात खटकण्यासारखे काहीही नाही. या आठवडापत्रा प्रत्येक अंक अतिशय अभ्यासपूर्ण असतो. मला खासकरून ‘प्रेरणा’, ‘तारुण्य’ आणि ‘बालकिशोर’ ही सदरे जास्त आवडतात.  मला फक्त काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.

१. आपलं मराठी साहित्य खूप अफाट आहे, परंतु आमच्यासारख्या काही नवीन वाचकांना किंवा इतर क्षेत्रातील लोकांना आपल्या साहित्य आणि साहित्यिकांविषयी जास्त माहिती नसल्यामुळे (काही नावाजलेले साहित्यिक सोडून) नेमके काय वाचायचे आणि कोणाचे साहित्य वाचायचे याबद्दल काही माहितीपर सदर चालू झाले तर खूप चांगले होईल.

२. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, इत्यादी ज्ञानबोधचे एखादे सदर सुरू व्हावे.

३. एखादे ऐतिहासिक सदर असावे ज्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि काळाच्या पडद्याआड राहिलेले निष्ठावंत सरदार यांच्याबद्दल माहिती मिळावी. तसेच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही माहिती मिळावी. खूप खूप अपेक्षा आणि आभार आहेत ‘झी मराठी दिशा’चे. नावाप्रमाणे हे आठचडापत्र दिशा देत आहे. इंटरनेटवर खूप माहिती मिळते, मात्र ती कितपत खरी असते याची खात्री नसते. तुमच्यामार्फत ही माहिती मिळाली तर ती खूप अभ्यासपूर्ण असेल हे नक्की. म्हणून मी सुचवलेले मुद्दे विचारात घ्यावेत असे वाटते.

रूपाली गवळी, बोरिवली, मुंबई

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

वाचनीय!
नुकताच ‘झी मराठी दिशा’ वाचनात आला. तो वाचल्यावर एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते की त्यातील सर्वच लेख फार सुंदर असून वाचनीयदेखील आहेत.

मिलिंद कुलकर्णी, पुणे


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link