Next
दृष्टिहीनांसाठी ‘ब्रेल मी’
प्रतिनिधी
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this story

दृष्टिहीनांना कोणतेही इ-बुक ब्रेलमध्ये तसेच इतर भाषेतूनही ब्रेलमध्ये वाचण्याची सोय आता उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे दृष्टिहीनांनी परीक्षेमध्ये ब्रेल लिपीत उत्तरे लिहिल्यास त्याची प्रिन्ट नेहमीच्या लिपीत घेण्याची सुविधाही नव्या उपकरणामुळे हाती येणार आहे. त्यामुळे दृष्टिहीनांच्या उत्तरपत्रिका तपासणे ब्रेल न जाणणाऱ्यांनाही शक्य होईल.

 दृष्टिहीनांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहांकित हेल्पलाईनतर्फे या वर्षी ‘ब्रेल मी’ नावाचे नवीन उपकरण शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  स्नेहांकित हेल्पलाइनतर्फे दृष्टिहीन व्यक्तींना लेखनिक पुरवण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचप्रमाणे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची साहित्यिक, काव्य अशा विविध विभागातील पुस्तके दृष्टिहीनांना ऑडिओ व अन्य माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही स्नेहांकिततर्फे केले जातात. स्नेहांकितच्या परिमला भट यांनी सांगितले की यंदा बालदिनानिमित्त मनोरंजक कार्यक्रमाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ‘ब्रेल मी’ नावाचे हे उपकरण ब्रेल लिपी इतर भाषेत व इतर भाषा ब्रेलमध्ये रूपांतरित करते. हे उपकरण दिव्यांग व्यक्तींसाठी, खास करून विद्यार्थी व नोकरदारवर्गासाठी वरदान ठरू शकते. ‘ब्रेल मी’ उपकरणाचे उत्पादक या उपकरणाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. ‘ब्रेल मी’ उपकरण वापरून दिव्यांग व्यक्ती कोणतेही इ-बुक ब्रेलमध्ये तसेच इतर भाषेतून ब्रेलमध्ये वाचू शकतील  किंवा ब्रेल भाषेतून इतर भाषेमध्ये प्रिंट घेऊ शकतील. दिव्यांग व्यक्ती परीक्षेची उत्तरे ब्रेलमधे देऊ शकतील आणि ते तपासण्यासाठी त्याची प्रिंट इतर नेहमीच्या लिपीत घेता येईल, हा त्याचा सर्वात मोठा फायदा. काही गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना हे उपकरण वापरण्यासाठी दिले जाणार आहे. भविष्यातही होतकरू व्यक्तींना हे उपकरण देण्याचा आमचा मानस आहे. इच्छुक व्यक्तींनी आपले नाव नोंदवावे.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजया वाड व हॉस्पिटॅलिटी उद्योगातील वरिष्ठ अधिकारी नितीन नगराळे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वाजता कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत हा कार्यक्रम होणार आहे.

संपर्क : ९९२०६८०३५९.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link