Next
‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न
विशेष प्रतिनिधी
Saturday, May 25 | 10:45 PM
15 0 0
Share this story

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेद्वारे ‘सौमित्र’ ही व्यक्तिरेखा घराघरात पोहचली आणि अभिनेता अद्वैत दादरकर याला अफाट लोकप्रियता मिळाली. अद्वैतला आता प्रेक्षक एका वेगळ्या भूमिकेत पाहत आहेत ते  ‘चला हवा येऊ द्या’ ‘शेलिब्रिटी पॅटर्न’मधून. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा खास संवाद…

‘चला हवा येऊ द्या’मध्ये कॉमेडी करणार हे कळल्यावर तुला कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
सगळे खूप खूश झाले, कारण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विविध प्रोजेक्ट्ससाठी नुसताच येऊन बसून हसत असतोस. किती वेळा तुला हसताना बघायचं त्यापेक्षा तुला विनोद करताना बघून आम्हाला हसू दे, असं अनेकांनी आवर्जून सांगितलं…

कॉमेडी करणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?
कॉमेडी करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कारण अॅक्शन, रिअॅक्शन, नेमकं टायमिंग हे सगळं अचूक लागतं. तुम्ही जे करता, त्यावर लोकांनी हसायला हवं. प्रेक्षकांनी तुमच्यावर हसता कामा नये, असं मला वाटतं.

भारत गणेशपुरे यांच्या ‘विदर्भ फायटर्स’ टीमचा सदस्य आहेस. कॉमेडीचे धडे गिरवण्यासाठी त्यांची किती मदत होते?
भारतदादाची स्टाईल मला प्रचंड आवडते. त्याची बॉडी लँग्वेज, उपरोधिक आणि उपहासात्मक बोलणं, त्यातून होणारा विनोद फारच कमाल आहे आणि मदत म्हणजे माझ्या पहिल्या स्किटमधला तुषार देवलवरचा  पहिला पंच त्यानंच सुचवला होता.

थुकरटवाडीतील तुझा फेव्हरेट विनोदवीर कोण आणि का?
- खरे तर सगळेच आहेत.  कारण प्रत्येकाचं काहीना काहीतरी वैशिष्ट्य आहे. परंतु श्रेया आणि भाऊ विशेष आवडतात. श्रेयाचा वेडसरपणा आणि भाऊ ज्या भाबडेपणानं पंचेस देतात त्याला खरोखरच तोड नाही.

‘शेलिब्रिटी पॅटर्न’मध्ये तुला टक्कर देणारा कलाकार कोण वाटतो?

- सगळेच आहेत. खरं तर टक्कर, स्पर्धा मला आवडत नाही. कॉमेडीला समोरचा कलाकार हा पूरक असायला हवा, टक्कर देणारा नाही. मी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वतः ला शोधायला आणि धमाल करायला आलो आहे. आणि ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. स्पर्धा वगैरे होतच राहतील, पण यातून स्वत:चा जो शोध आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link