Next
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
विशेष प्रतिनिधी
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सध्या विविध परीक्षांचे निकाल लागण्याचा मोसम सुरू झाला असून दहावी, बारावी, स्पर्धापरीक्षा ते वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपात्र स्पर्धांचे निकाल लागले आहेत. या सर्व स्पर्धांत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे ‘झी मराठी दिशा’ मन:पूर्वक अभिनंदन करीत आहे. सध्याचे जग स्पर्धेचे आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रांतील स्पर्धेत तयारीनिशी उतरावेच लागते. अशा स्पर्धांत जे यशस्वी ठरत नाहीत, ते त्या स्पर्धेपुरते अयशस्वी असतात. या स्पर्धेव्यतिरिक्त जीवन असते व तेथे यशस्वी होण्याचे अनेक मार्ग असतात. या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची गरज असते. त्यासाठी कोचिंग क्लासेस वगैरे असले तरी सर्व विद्यार्थ्यांना ते परवडणारे नसते. त्यामुळे ‘झी मराठी दिशा’ने या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या टिप्स देणारे लेख प्रसिद्ध केले आहेत व यापुढेही ते प्रसिद्ध होत राहतील. स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती ‘झी मराठी दिशा’तील विविध लेखांमध्ये असते. त्यात परराष्ट्रधोरण, संरक्षणसमस्या, देशापुढील आर्थिक प्रश्न आदी विषयांची चर्चा केलेली असते. एवढेच नाही तर, या उच्च व अतिउच्च शिक्षणाच्या स्पर्धेत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याचीही माहिती देणे गेल्या काही अंकापासून ‘झी मराठी दिशा’ने सुरू केले आहे व त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. विद्यार्थ्यांनी हे सर्व अंक पाहावेत व त्याबाबत त्यांच्या सूचना व प्रतिक्रिया कळवाव्यात. ‘झी मराठी दिशा’ पहिल्या अंकापासून तरुणांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी माहिती सातत्याने प्रसिद्ध करीत आहे. त्यात अधिक भर टाकण्याचा व वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू राहील. उद्या, ८ जूनला आंतरराष्ट्रीय महासागरदिन आहे. त्यानिमित्ताने महासागर व समुद्रांविषयीची फारशी ज्ञात नसलेली माहिती ‘महासागर’ या खास विभागामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. महासागर हे पृथ्वीच्या पर्यावरणाचे अभिन्न अंग आहेत, आपले दैनंदिन जीवन या महासागरांवर अवलंबून आहे, परंतु आपल्याला त्याची फारशी जाणीव नसते. या महासागरांतील पाण्याची पातळी कमी जास्त झाली किंवा त्यातीत पाण्याचे तापमान किंचितही कमी जास्त झाले तर हाहाकार माजू शकतो. भारतातला मोसमी पाऊस तर या महासागरातील काही महत्त्वाच्या प्रवाहांवर अवलंबून आहे, हे अलिकडच्या संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे या महासागरांची, तसेच आपल्या सभोवतालचे समुद्र, उपसागर, खाड्या, सामुद्रधुन्या यांची माहिती देण्याचा प्रयत्न या विशेष विभागातील लेखांत करण्यात आला आहे. अर्थात आठवडापत्राच्या मर्यादित जागेत मर्यादित माहिती देता येते. परंतु या लेखांपासून प्रेरणा घेऊन वाचक व विद्यार्थ्यांनी अन्य ग्रंथांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा, हाच या विशेष विभागामागचा उद्देश आहे. निवडणुकीचा गदारोळ आणि त्याची वार्तापत्रे यावर हा चांगला उतारा ठरेल. केंद्रातील नव्या मंत्रिमंडळाचे काम सुरू झाले आहे. नवे गृहमंत्री अमित शाह यांच्या कारभाराबाबत जनतेत मोठी उत्सुकता आहे. सामान्य लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते काय करतात, तसेच काश्मीरप्रश्न आणि नक्षलवादाची समस्या ते कशी सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link