Next
कवितेतली विरामचिन्हे
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कविता वाचताना तिच्यातल्या विरामचिन्हांच्या जागा नीट लक्षात ठेवाव्या लागतात. भाषेत जी विरामचिन्हं असतात, त्यांच्यामुळे शब्दांचा अर्थ चांगल्याप्रकारे समजायला मदत होत असते. ‘स्वल्पविराम’ या कवितेत मी अनेक गोष्टींची यादी करताना स्वल्पविराम कसा उपयोगी पडतो, ते लक्षात आणून दिलं आहे. उदाहरणार्थ
‘उंट, जिराफ, हत्ती यांच्यावरून हिंडू
फुगा, पतंग, बाण  हवेमध्ये सोडू’
कवितांमध्ये काही वेळा वेगळी चिन्हेही येतात. कवी गिरीश यांची ‘कृतज्ञता’ ही कविता आहे. त्यात कोकणातला एक गरीब मुलगा शिक्षणासाठी शहरात जातो नि खूप आजारी पडतो. शेवटी मृत्यू जवळ आल्यावर तो आपली काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानतो, ते असे :
‘नको आता! उपकार फार झाले!
 तुम्ही मजला किती...गोड...वागवीले!
 भीत...दादा...मरणास...मुळी...नाही!
 तु...म्ही...आई...!! बोलला पुढे नाही !
यात मुलाला बोलणं जड जात आहे, हे दाखवायला शब्द तुटकपणे येतात. अशा चिन्हांमधून कवितेत भावपूर्णता, नाट्यपूर्णता येते. ही चिन्हे त्यामुळे बोलकी ठरतात.
विंदा करंदीकर यांची ‘माकडाचे दुकान’ ही कविता आठवा. त्यात काही संवाद आहेत. त्यातला हा नमुना पाहा :
‘अस्वल आले
नाचवीत पाय
म्हणाले ,‘मधाचा  
भाव काय’?
यातले अवतरणचिन्ह व प्रश्नचिन्ह महत्त्वाचे आहे. कविता वाचताना अस्वलासाठी केव्हा वेगळा आवाज काढायचा, हे त्यातून कळते. आरती प्रभू यांची ‘काचेचे गाणे’ नावाची कविता आहे. त्यातले कोणते शब्द लांब उच्चारायचे ते कळावे, म्हणून कशी चिन्हं वापरली आहेत पाहा :
‘माझा चमचा चांदीचा sss चांदीचा sss
पेला पिवळा काचेचा sssकाचेचा sss’
अशा चिन्हांमुळे अर्थाचे बारकावे कळतात, शिवाय कविता म्हणतानाही मजा येते .
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link