Next
प्रियांकाच्या लग्नाला बॉलिवूडची अनुपस्थिती?
विशेष प्रतिनिधी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

दीपिका-रणवीर सिंगच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जोधपूर येथील उमेद भवनमध्ये प्रियांका आणि निक यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रियांकानं आपल्या लग्नाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही. वाचून आश्चर्य वाटेल,पण हे खरंच आहे. इतकंच नाही तर तिनं ज्यांच्याबरोबर चित्रपटांत काम केलं आहे, त्यांनाही निमंत्रण दिलेलं नाही. आपल्या लग्नाचा सोहळा न होता त्याचं खासगीपण जपलं जावं आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार केवळ आप्तस्वकीयांनीच व्हावं, अशी तिची इच्छा आहे. दरम्यान लग्नातील फोटोचे हक्क तिने एका मासिकाला कोट्यवधी किंमतीला विकले असल्याचं समजत आहे. या सोहळ्यातला कोणताही फोटो किंवा माहिती लीक होऊ नये म्हणून लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालण्यात आल्याचं समजत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link