Next
लालबहादूर शास्त्री
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

आपले दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव होते. काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळाल्यानंतर ते शास्त्री म्हणूनच ओळखले जाऊ लागले. शास्त्रीजींचा स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग होता. कणखरता, लवचीकता, साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा, निर्लेप चारित्र्य असे गुण हेरूनच नेहरूंनी त्यांची मंत्रिपदी निवड केली. पंडित नेहरूंच्या निधनानंतर पाच फूट उंचीचे, किरकोळ देहयष्टीचे शास्त्रीजी पंतप्रधान झाले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी या ‘छोट्याशा’ माणसाच्या कार्यकाळात काश्मीर ताब्यात घेण्यासाठी १९६५ साली भारतावर आक्रमण केले.
शास्त्रीजींनी हे युद्ध केवळ काश्मीरपुरते मर्यादित न ठेवता थेट लाहोरच्या दिशेने सैन्याला आगेकूच करण्याचे आदेश दिले. युद्धकाळात शास्त्रीजी विरोधकांनाही विश्वासात घेऊन जनतेचे नेतृत्व करत होते. पाकिस्तान अमेरिकेच्या गटात असल्याने, भारताला पीएल ४८० करारान्वये देत असलेला गहू अमेरिकेने दिला नाही. गव्हाचा तुटवडा जाणवू नये म्हणून शास्त्रीजींनी भारतीयांना आठवड्यात एक वेळ भोजनाचा त्याग करण्याचे आवाहन केले. याआधी शास्त्रीजींनी आपल्या कुटुंबीयांसह आठवड्यात एक वेळ उपाशी राहण्याचा अनुभव घेतला होता. शेतकऱ्यांचे महत्त्व भारतीयांना पटवण्यासाठी त्यांनी ‘जय जवान – जय किसान’ हा अजरामर मंत्र दिला.
युद्धात पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव करून शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिले. भारत युद्धखोर, साम्राज्यवादी नसून शांततापूर्ण सहजीवनावर भर देणारा देश असल्याचा संदेश, ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला. या करारात काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचे कलम घ्यावे, या आयुब खान यांच्या आग्रहाला ठामपणे नकार देऊन भारताच्या अटींवर आयुब खान यांना करारावर सही करण्यास भाग पाडले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link