Next
सिंधू परिपक्व खेळाडू!
विशेष प्रतिनिधी
Friday, December 21 | 04:00 PM
15 0 0
Share this story

सिंधूला सरते वर्ष खूप चांगले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यानंतर तिला प्रारंभी लाँग रॅलीची जरा समस्या भेडसावली, परंतु श्रीकांत, गुरू साईदत्त यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंसमवेत सराव केल्यानंतर तिला लाँग रॅलीजचे गुण घेण्याचे कसब अवगत झाले. विजेती होण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तिने फायनलमध्ये जागा निश्चित करण्याचा धडाका लावला, पण तिथे ती गडबडून जात होती. परिणामी, प्रशिक्षक गोपीचंदने तिला चक्क ब्रेक दिला. तिच्या खेळाचा अभ्यास केला. बॅक टू दी बेसिक्स असे ते चक्क क्लासरूममध्ये गेले. तिच्या खेळाचे विश्लेषण केले. इतर खेळाडूंविषयीची रणनीती ठरवली आणि सिंधूचा खेळ उंचावला!
बॅडमिंटनचे सध्याचे वेळापत्रक खूपच आव्हानात्मक आहे. शारीरिक-मानसिक आणि आर्थिक अशा अनेक स्तरांवर कसरत करावी लागते. त्यातच, कोरिया-जपान, चीन आणि युरोपीय खेळाडूंनी बॅडमिंटनचे स्वरूप बदलून टाकले आहे. बॅडमिंटन हा पूर्वी अतिशय नाजूक, नजाकतभरा असा खेळ होता. आता तो फिटनेस-पॉवरफुल झाला आहे. परिणामी, त्याला लागणारी शारीरिक तंदुरुस्ती खूपच वाढली आहे. वर्षभर सुपर सीरिज खेळताना तंदुरुस्तीचा कमालीचा कस लागतो. तसेच, कौशल्याचा दर्जादेखील अबाधित ठेवावा लागतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोर्टवर आणि कोर्टबाहेर एकाग्रचित्त राहणे अतिशय गरजेचे बनले आहे. त्या आघाडीवरदेखील सिंधूने अतिशय कौतुकास्पद परिपक्वता दाखवली आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक वगैरे खूपच दूरची गोष्ट आहे. सुपर सीरिज सर्किटमध्ये आता विजेती या नात्याने कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवणे हे पुढील वर्षभरासाठीचे सिंधूपुढील मोठे आव्हान आहे. तिच्या खेळात सातत्य आहे, प्रचंड ऊर्जा आहे. त्यामुळे पुढील काळातही ती नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link