Next
इच्छित स्थळी
अमृता दुर्वे
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


ऑफलाईन मॅप्स
मॅप सगळ्यात जास्त वापरला जातो तो, एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. कोणत्या दिशेनं जायचं, कुठे वळायचं हे सांगणारं टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन खूप उपयोगी पडतं. परंतु समजा, तुम्ही जिथे जाणार आहात तिथे नेटवर्कच नसेल, तर काय? अशावेळी तुम्हाला गुगल मॅप्सच्या ऑफलाइन फीचरचा फायदा होईल. यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो मॅप फोनवर डाऊनलोड करून ठेवू शकता. मॅप्समध्ये डावीकडच्या ऑप्शन्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल. तुम्हाला जिथला मॅप हवा आहे, तो भाग सिलेक्ट करून डाऊनलोड करा. आता तुमच्या फोनला नेटवर्क नसलं तरी तुम्हाला हा मॅप पाहता आणि वापरता येईल.

अॅड स्टॉप्स
कारनं प्रवासाला निघताना आपण ‘अ’ ठिकाणाहून निघून थेट ‘ब’ ठिकाणी पोहोचलो, असं फार कमी वेळा होतं. कधी कोणालातरी मध्येच पिक-अप करायचं असतं, कधी पोटपूजा करायला आपण थांबतो किंवा मध्येच दुसरीकडे कुठेतरी भेट देऊन मग पुढे जायचं ठरतं. अशावेळी गुगल मॅप्सचा हा पर्याय फायद्याचा ठरेल. यामध्ये तुम्हाला मध्ये जिथे जायचंय, ती ठिकाणं मॅपमध्येच अॅड करता येतील. यामुळे प्रत्येक ठिकाणी जायचा रस्ता वेगळा शोधायला नको. यासाठी तुम्ही जिथून सुरुवात करणार आहात आणि जिथे पोचायचं आहे ती दोन्ही ठिकाणं नेव्हिगेशनमध्ये घाला. आता उजव्या बाजूच्या तीन ठिपकेवाल्या ऑप्शनवर क्लिक करा. यात तुम्हाला अॅड स्टॉप्सचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला प्रवासादरम्यान जिथे जिथे जायचं आहे, त्या जागा नोंदवा. यानं तुम्हाला या सगळ्या ठिकाणांवरून जायचा रस्ता दाखववणारा मॅप मिळेल आणि प्रवासाला किती वेळ लागणार आहे तेही समजेल.

शेअर लोकेशन
अनेकदा आपण सगळे एकाच ठिकाणी भेटायचं ठरवतो, पण आपण नेमके कुठे आहोत हे आता तुम्हाला सगळ्यांना गुगल मॅप्सच्या मदतीनं सांगता येईल. यासाठी तुमच्या फोनचं जीपीएस लोकेशन ऑन करा. आता गुगल मॅप्समध्ये डाव्या बाजूच्या ऑप्शनवर क्लिक करा. यात तुम्हाला शेअर रिअल टाइम लोकेशन हा पर्याय मिळेल. याद्वारे तुम्ही आता आहात ते लोकेशन तुम्हाला एकाच वेळी अनेक जणांसोबत शेअर करता येईल. किती वेळासाठी लोकेशन दाखवायचं आहे, तेदेखील तुम्ही ठरवू शकता. म्हणजे सुरुवात केल्यापासून पुढचा एक तास, दोन तास किंवा तुम्हाला हवा तेवढा वेळ यात निवडता येईल. या फीचरच्या मदतीनं तुमची मित्रमंडळी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.

पार्किंग लोकेशन
एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर आपण गाडी नेमकी कुठे पार्क केली आहे, ते लक्षात ठेवणं किंवा शोधणं कधी कधी कठीण जातं. अनेकदा सगळ्या गल्ल्या सारख्याच दिसायला लागतात. अशावेळी गुगल मॅप्स मदतीला येईल. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी कार पार्क केल्यावर गुगल मॅप्स सुरू करा. यात तुम्ही आहात ते लोकेशन निळ्या डॉटनं दाखवलं असेल. या निळ्या डॉटवर क्लिक केल्यावर काही पर्याय असतील. त्यात एक पर्याय आहे - सेव्ह युअर पार्किंग. हा पर्याय वापरून तुम्ही कार जिथे पार्क केली आहे, ते लोकेशन सेव्ह करा. आता तुम्हाला तुमची गाडी शोधणं एकदम सोपं आहे.  

उबर / ओला / मेरू
टॅक्सी करून बाहेर जायचं असेल तर आपण काय करतो? तर उबर, ओला किंवा मेरू किंवा इतर कोणतं अॅप सुरू करून टॅक्सी उपलब्ध आहे का, दर काय आहे, किती मिनिटांवर आहे ते तपासतो. परंतु आपल्याला त्या त्या सेवेचं अॅप उघडून हे करावं लागतं. परंतु गुगल मॅप्स वापरून तुम्ही हे काम करू शकता.
तुम्हाला जिथे जायचंय ते ठिकाण नेव्हिगेशनमध्ये टाकून रस्ता शोधा. आता तुम्हाला कारनं, ट्रेननं, चालत किती वेळ लागतो हे सांगणारे पर्याय दिसतील. यातच शेवटचा पर्याय आहे - हायर टॅक्सी. याचा वापर करून तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. मुंबईमध्ये यात उबर, ओला आणि मेरूची सेवा उपलब्ध आहे. गुगल मॅप्सच्या एकाच अॅपमध्ये तुम्हाला कोणत्या सेवेची टॅक्सी किती अंतरावर आहे, आणि कोणती सेवा कमी दर देतेय हे पाहता येईल आणि टॅक्सी बुकही करता येईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link