Next
नोकरी शोधताय?
विशेष प्रतिनिधी
Friday, September 27 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘आयबीपीएस’मध्ये रोजगाराची संधी
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात ‘आयबीपीएस’तर्फे ‘क्लार्क’ या पदासाठी रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढे दिला आहे.

महत्त्वाच्या तारखा-
अर्ज करण्याची अंतिम तारीख- ९ ऑक्टोबर २०१९
ऑनलाइन परीक्षेची तारीख-
पूर्वपरीक्षा- ७, ८, १४ व २१ डिसेंबर २०१९.

ऑनलाइन परीक्षेचा निकाल- डिसेंबर २०१९.
मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाऊनलोड करणे-
जानेवारी २०२०.

मुख्य परीक्षा- १९ जानेवारी २०२०.
मुख्य परीक्षेचा निकाल- १ एप्रिल २०२०.

पदांची संख्या- १२०७५ पदे (महाराष्ट्रासाठी १२५७ पदे)

पात्रतेचे निकष-
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय किमान २० वर्षे व कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

शैक्षणिक अर्हता- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा व त्याने माध्यमिक/उच्च माध्यमिक/पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय घेतलेला असावा. त्याला संगणकाचे ज्ञान असावे.

निवडप्रक्रिया-
उमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्जाचे शुल्क- सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ६०० रुपये असून एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/इएक्सएसएम या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १०० रुपये असेल.

अर्ज कसा कराल?
इच्छुक व पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम आयबीपीएसच्या ibps.sifyitest.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर Career section मधील IBPS Recruitment 2019 for Clerk Posts या टॅबवर क्लिक करावे. तेथे असलेला अर्ज पूर्ण व अचूक भरावा. त्यानंतर अर्जाचे निर्धारित शुल्क भरून Submit करावे व पुढील उपयोगासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link