Next
‘आनंदी गोपाळ’
प्रतिनिधी
Friday, January 04 | 03:45 PM
15 0 0
Share this story

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर अर्थात आनंदीबाई जोशी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, समाजाचा रोष पत्करून त्यांनी डॉक्टरकीची पदवी घेतली. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा ‘झी स्टुडिओ’चा चित्रपट १५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देगणी आहे,’ असं म्हणत झी स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्धांस यांचे आहे.  या चित्रपटाची कथा-पटकथा करण श्रीकांत शर्मा, संवाद इरावती कर्णिक, गीत लेखन वैभव जोशी यांचे आहे. 

दहाव्या वर्षी आनंदीबाईंचे लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. ‘आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. आनंदीबाईंच्या शिक्षणात अडसर नको म्हणून गोपाळरावांनी कोल्हापूरमध्ये बदली करून घेतली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख झाल्यावर गोपाळरावांच्या मनात आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचे शिक्षण करण्याचा विचार आला.  अर्थात हा प्रवास खूप खडतर असा होता. आनंदीबाईंचा हाच खडतर प्रवास ‘आनंदीगोपाळ’मध्ये पाहायला मिळणार आहे.  

दरम्यान, ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाचे पोस्टर अलिकडेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर १३२ वर्षांपूर्वी आनंदीबाईंचा डॉक्टरकीची पदवी घेतेवेळी घातलेल्या पेहरावातील मूळ फोटो प्रसिद्ध केला आहे. त्या फोटोत आनंदीबाईंनी नथ घातली घातली होती. परदेशी भूमीवर असूनही त्यांनी आपली संस्कृती जपली होती. हाच संदर्भ घेत  मराठी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी नथ घालून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.  यामध्ये अमृता खानविलकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, प्रियांका बर्वे, दीप्ती देवी, आनंदी जोशी आणि स्पृहा जोशी यांनी हे व्हिडिओ शेअर केले आहेत. मराठी अभिमान, १३२ इयर्स अगो आणि कॅमिंग सून असे हॅशटॅग असलेल्या व्हिडिओमध्ये या अभिनेत्री मराठमोळ्या नथीचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व सांगत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link