Next
जन गण मन
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मध्यंतरी तुम्हाला वंदे मातरम् आपली कथा सांगून गेल्याचं समजलं. मलापण राहावलं नाही. म्हटलं या बालमित्रांशी आपणही गप्पा मारुया! तर मी जन गण मन.....
माझ्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. म्हणून मी स्वत: तुम्हाला माझ्याबद्दल सांगायला आलो. रवींद्रनाथ टागोर हे माझे जन्मदाते. त्यांनी १९०६ साली शांतिनिकेतनमध्ये माझ्या निर्मितीस सुरुवात केली. आपल्यावर त्याकाळी इंग्रज राज्य करीत होते, त्यांचा राजा जॉर्ज पंचम (म्हणजे पाचवा) १९११ मध्ये भारतात आला होता. ब्रिटिश मीडियानुसार माझी रचना त्यावेळी टागोरांनी राजाच्या स्वागतासाठी केली. पण भारतीय मीडियाने स्पष्ट केले की हे देवतांच्या स्तुतीचे गीत आहे, पंचम जॉर्जच्या स्वागताचे नाही. त्यातला भारत भाग्यविधाता हा उल्लेख म्हणे पंचम जॉर्जला उल्लेखून होता! टागोरांनी असे सांगितले की त्यांना अपेक्षित अर्थ ‘भारत अनादी काळापासून आपले भाग्य स्वत: लिहीत आला आहे’ असा होता.  रवींद्रनाथ टागोर कशाला जॉर्जच्या स्वागताचे गीत लिहितील? त्यांनी तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी निषेध म्हणून परत केली होती. तर सांगायची गोष्ट अशी, की माझी रचना भारताच्या आणि ईश्वराच्या स्तुतीसाठी झाली आहे. भारतातील विविध राज्यांचा उल्लेख माझ्या कडव्यांमध्ये येतो, तसाच पर्वत, नद्या यांचाही येतो.
माझी संपूर्ण रचना पाच कडव्यांची आहे. तुम्हाला फक्त एकच कडवे माहीत असेल. पूर्ण गीत वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल, माझी रचना आपल्या भारत देशाचे गुणगान करण्यासाठीच आहे. तेव्हा वंदे मातरम् सारखीच माझीही पूर्ण पाच कडवी मिळवा आणि पाठ करा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link