Next
‘आठवणीतला गणेशोत्सव’
प्रतिनिधी
Friday, August 30 | 01:45 PM
15 0 0
Share this story

द्वितिय विजेता
कमल नरहर शिरवळकर
मुलुंड (पू.), मुंबई
-----------------------------------------------

चंद्रदर्शन आणि आरोप


गोष्ट जुनीच परंतु तिची दरवर्षी आठवण येते. ४५ वर्षांपूर्वी भाईंदर येथून आमचे स्थलांतर झाले. आता आम्ही मुंबईकर झालो होतो. जून १९६८ मध्ये मुलुंड पूर्वेस राहण्यास आलो. आमचे सर्व नातेवाईक भाईंदर येथेच होते. गणपतीबरोबर गौरीच्या सणासाठी आम्ही पाच दिवस मुलुंडहून पुन्हा भाईंदरला गेलो. आमचे मुलुंडचे घर पाच दिवस बंदच ठेवले. पाच दिवसांनंतर एकत्र गौरीगणपतीदर्शन आटोपले आणि मुलुंडला परतलो.
संध्याकाळी एक फुलवाला हातात टोपली घेऊन दरवाजात आला. फुलपुडी दिली, पण जाईना. तसाच उभा. काही हवे आहे का, असे आम्ही विचारले. तसा तो म्हणाला, “गणपतीच्या दिवशी तुमचा मोठा मुलगा (वय वर्षे १४) आमच्या दुकानातून हार व फुले घेऊन गेला होता. त्याचे पैसे बाकी आहेत. अजून दिलेले नाहीत.”
हे ऐकल्यावर आम्ही सर्व अवाक् झालो, कारण आम्ही सर्व त्या दिवशी व चार दिवस भाईंदरलाच होतो. त्यामुळे आम्ही त्याला सांगितले, हे कसे शक्य आहे. तुमच्याकडून हार-फुले नेणारा दुसराच कुणीतरी असेल. माझ्या मुलाने तुमच्याकडून हार-फुले वगैरे काही नेण्याचा प्रश्नच नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे.
तेवढ्यात माझा मुलगा बाहेरून घरात आला. तसा तो फुलवाला म्हणाला, “हाच तो मुलगा. यानेच हार-फुले नेली माझ्या दुकानातून.”
आता मात्र हद्द झाली. तो फुलवाला फक्त चार रुपये मागत होता. १९६८ सालची गोष्ट. वादविवाद नको म्हणून आम्ही नाइलाजाने चार रुपये दिले. विषय मिटवला.
रात्री जेवणानंतर सगळे गप्पा मारत बसलो होतो. टीव्ही नव्हते तेव्हाची ही गोष्ट. गप्पा मारताना विषय होता गणेशचतुर्थी हाच. या दिवशी आपण चंद्रदर्शन घेतले किंवा आपल्यास चंद्रदर्शन झाले तर आपल्यावर चोरीचा किंवा खोटा आळ येऊ शकतो, या मुद्यावरून गणपती व चंद्र यांची गोष्ट सांगितली जात होती.
आता उलगडा झाला. पुराणातील या आधारे माझ्या मुलावर त्या हारवाल्याने आळ घेतला. खोटा आरोप. कारण गणपतीने तसा चंद्राला शापच दिला आहे. जो कोणी गणेशचतुर्थीला तुझे दर्शन घेईल किंवा त्याला दर्शन होईल त्याच्यावर खोटा आळ येऊ शकतो.
यावर उ:शाप (उपाय) चंद्राने मागितला तेव्हा मग गणपतीने सांगितले, की संकष्टीचतुर्थीला चंद्रोदय झाल्यावरच आणि चंद्राचे दर्शन घेतल्यावरच संकष्टीच्या व्रताचे पुण्य लाभेल.
एक आठवण आणि एक पुराणातील संदर्भ. असो. गणेशचतुर्थीला आठवण कायम होते, अशीही.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link