Next
स्वयंपाकघरात लुडबूड
- रेणू दांडेकर
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आज आपण आपल्या आपल्या घरातील स्वयंपाकघरात जाणार आहोत. म्हणजे एरवी जातो ते आईजवळ जेवण, खाऊ मागायला. आज जाणार आहोत वेगळ्या कारणासाठी. स्वयंपाकघर समजून घ्यायला. काय काय असतं स्वयंपाकघरात? बालवाडीत असताना आपण डाळी ओळखत होतो. आता कुणी सांगितली मुगाची डाळ, मसुराची डाळ, मोहरीची डाळ, उडीद डाळ, तर ओळखाल? बघा याचं उत्तर तुम्ही तुम्ही तुमचं द्यायचंय. ओळखत असाल तर छानच, पण नसाल, तर घेउया समजून. यासाठी आपण आपल्याच आईशी, वडिलांशी, आजीशी गप्पा मारणार आहोत. अगदी यात मोठ्या ताई-दादांनाही घेण्यास हरकत नाही. खरं तर यासाठी खूप वेळ द्यायला हवाय. आपण पुढे दिलेल्या काही मुद्यांचा शोध घेउया-
•    स्वयंपाकघरात कोणकोणती यंत्रं आहेत? त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो?
•    तुमच्या घरात कोणकोणती कडधान्यं आणली जातात? त्यापासून काय काय बनवलं जातं?
•    कोणकोणती धान्यं आणली जातात? त्यांचे कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
•    कोणकोणती फळं व भाज्या आणल्या जातात?
•    स्वयंपाकघरात कोण कोण काम करतं? तुम्ही काय मदत करता?
•    स्वच्छता कशी ठेवली जाते?
•    आई किती काम करते स्वयंपाकघरात?
•    कोणकोणती भांडी आहेत? त्यांना काय म्हणतात? त्यांचे उपयोग काय?
आईचं किंवा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं व्यवस्थापन, नियोजन बघा. हाही फार वेगळा भाग आहे. आई जेवढा वेळ स्वयंपाकघरात उभी असते ते पाहा एके दिवशी.  निरीक्षण करा.  मग तुमच्या लक्षात येईल, साधा भात बनवायला किती नि काय करावं लागतं.
ठरवा की दर रविवारी आपण एक पदार्थ करायला शिकायचा. अगदी साध्या पोह्यांपासून सुरुवात करुया. नंतर पोळी, पुरी ते भाकरी. मजा येते खूप. कारण आपण समजतो तितकं हे साध-सोपं नाही. ‘हे नाही मला आवडलं’ असं सहज म्हणतो आपण, पण पदार्थ करायला किती वेळ, श्रम दिलेत याचा अनुभव घेतलेला बरा. मगच, पानात टाकू नये, पदार्थांना नावं ठेवू नयेत, याचा अर्थ आपल्याला समजेल. म्हणून घेऊ या अनुभव स्वयंपाकघराचा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link