Next
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१९
फारुक नाईकवाडे
Friday, November 23 | 05:47 PM
15 0 0
Share this story

मागील लेखामध्ये केंद्र शासनाच्या समांतर सुरक्षायंत्रणांमधील वरिष्ठ पदावरील भरतीप्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. देशाच्या मुख्य संरक्षणदलांमध्ये विविध पदांवर नेमणुकीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कर्मचारी भरती मंडळ (SSB)यांच्यामार्फत भरती प्रक्रिया पार पाडली जाते. या लेखामध्ये संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१९ बाबत -

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेतून पुढील संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येतो-
१.    भारतीय लष्करी अकादमी, डेहराडून
२.    भारतीय नौसेना अकादमी, एझीमाला
३.    वायुदल अकादमी, हैदराबाद
४.    अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई
 
महिला उमेदवारांचा विचार केवळ अधिकारी प्रशिक्षण अकादमीमधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये प्रवेशासाठी केला जातो. पुरुष उमेदवारांनी वरील पर्यायांपैकी आपला पसंतीक्रम देणे आवश्यक असते. लष्कराच्या तीन दलांमधील कोणत्याही परीक्षेसाठी पात्र न ठरलेल्या पुरुष उमेदवारांचा विचार अधिकारी प्रशिक्षण अकादमीमधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये प्रवेशासाठी करण्यात येतो.

  • उमेदवारांसाठी पात्रता
वयोमर्यादा व वैवाहिक दर्जा
१.    भारतीय लष्करी अकादमीसाठी - अविवाहित पुरुष उमेदवार, ज्यांचा जन्म २ जानेवारी १९९६ पूर्वी किंवा १ जानेवारी २००१ नंतर झालेला नसावा.
२.    भारतीय नौदल अकादमीसाठी - अविवाहित पुरुष उमेदवार, ज्यांचा जन्म २ जानेवारी १९९६ पूर्वी किंवा १ जानेवारी २००१ नंतर झालेला नसावा.
३.    वायुदल अकादमीसाठी - अविवाहित पुरुष उमेदवार, ज्यांचा जन्म १ जानेवारी २००० नंतर किंवा एक जानेवारी १९९६ पूर्वी झालेला नसेल. ज्या उमेदवारांकडे व्यावसायिक वैमानिकाचे जीपीएसकडून प्राप्त लायसन असेल त्यांच्यासाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्यात येते. अशाप्रकारे ज्या वैमानिकांना वयाच्या २६ वर्षापर्यंतची वयोमर्यादा प्राप्त होते ते साठी वयाच्या २५ वर्षानंतर अविवाहित असण्याची अट लागू होत नाही.
४.    अधिकारी प्रशिक्षण अकादमी (पुरुषांसाठी ) - अविवाहित पुरुष उमेदवार ज्यांचा जन्म २ जानेवारी १९९६ पूर्वी किंवा १ जानेवारी २००१ नंतर झालेला नसावा.
५.    अधिकारी प्रशिक्षण अकादमी ( महिलांसाठी) -  अविवाहित किंवा अपत्यप्राप्ती न झालेल्या तसेच विधवा अथवा घटस्फोटित महिला, ज्यांचा जन्म २ जानेवारी १९९५ पूर्वी किंवा १ जानेवारी २००१ नंतर झालेला नसावा.
  (घटस्फोटित अथवा ज्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे अशा पुरुष उमेदवारांना अविवाहित मानले जात नाही.)

  • शैक्षणिक पात्रता
१.    भारतीय लष्करी अकादमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमीसाठी
     मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
२.     भारतीय नौसेना अकादमी
     मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी
३.     वायुदल अकादमी
    दहा अधिक दोन स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणित विषयासहित मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी

  • परीक्षायोजना
ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कर्मचारी भरती मंडळ (SSB) यांचेकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येते. परीक्षेचा लेखी टप्पा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून तर बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व चाचणीचा टप्पा कर्मचारी भरती मंडळाकडून आयोजित केला जातो. परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

  • लेखी परीक्षा
भारतीय लष्करी अकादमी, भारतीय नौसेना अकादमी आणि वायुदल अकादमीसाठी लेखी परीक्षा पुढील प्रमाणे होते.अधिकारी प्रशिक्षण अकादमीसाठी परीक्षा पुढील तक्त्याप्रमाणे होते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारचे असते आणि प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे मिळालेल्या एका उत्तराचा गुण वजा करण्यात येतो. सामान्य ज्ञान व मूलभूत गणितात पेपर हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतो. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेच्या जाहिरातींमध्ये सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.

  • बौद्धिक व व्यक्तिमत्त्व चाचणी
या टप्प्यास एसएसबी प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया टप्पा एक आणि टप्पा दोन अशा पद्धतीने पार पडते. टप्पा १ मध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार टप्पा दोनसाठी पात्र ठरतात.

  • एस एस बी टप्पा 1
यामध्ये अधिकारी बुद्धिमत्ता रेटिंग (Officers Intelligance Rating -OIR) आणि चित्रबोधन वर्णन परीक्षा ( Picture Perception & Description Test PP&DT) या दोन परीक्षांचा समावेश होतो. टप्प्याच्या आधारावर एसएसबी टप्पा दोनसाठी उमेदवारांची निवड करण्यात येते.

  • एसएसबी टप्पा 2
यामध्ये मुलाखत , घटक चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी व परिसंवाद यांचा समावेश असतो हा टप्पा चार दिवस चालतो. या टप्प्याबाबत विस्तृत माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एसएसबी टप्प्यातील मूल्यमापन हे मुलाखतकार अधिकारी (IO), गट चाचणी अधिकारी (GTO) व मानसशास्त्रज्ञ यांचेकडून एकत्रितपणे करण्यात येते. ज्या उमेदवारांमध्ये अधिकाऱ्यांसारखे गुण आहेत का तसेच ते प्रशिक्षणक्षम आहेत का याची खातरजमा करण्यात येते. या आधारावर कर्मचारी निवड मंडळाकडून उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस करण्यात येते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link