Next
नकाशाची पूर्वतयारी
- रेणू दांडेकर
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आज थोडंसं वेगळंच काम आपण करणार आहोत. हे एका रविवारी मिळणाऱ्या वेळात पूर्ण होईल असं नाही. त्यामुळे तयारीसाठी एक रविवार आणि प्रत्यक्ष काही करण्यासाठी दुसरा रविवार असं करुया. सगळं कसं नीट करता येईल. आज आपण जे करणार आहोत त्यामुळे आपण काय काय पाहतो याचा अंदाज येईल. आपल्या परिसरातील अनेक ठिकाणांची माहिती आपल्याला जमा करता येईल. एरवी भूगोलात आपण तयार नकाशात माहिती भरतो. प्रत्यक्ष नकाशा नाही काढत. आज आपण आपल्या परिसराचा नकाशा काढण्याचा अनुभव घेउया. या निमित्तानं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक माणसांबद्दल माहिती जमवता येईल. आणि बरंच काही करता येईल...
तुम्ही कुठे राहता, त्याचा नकाशा तयार केलाय कधी? नसेल तर करुया. आधी तुमच्या परिसरात कोणकोणती ठिकाणं महत्त्वाची आहेत, त्याची यादी करू. त्याप्रमाणे पेपरवर (खोक्यांची पाठकोरी बाजू वापरता येईल) ती नावं लिहा. फार मोठी अक्षरं नको. घरं कोणती आहेत, त्यांची नावं, त्यांचं स्वरूप कसं आहे, कार्डपेपरची घराची प्रतिकृती (मॉडेल) तयार करू. नंतर हे आपल्याला कार्डपेपरवर लावायचं आहे. घरांना नावं असतील तर त्या घरावर लिहू. दुकानं, शाळा, विशेष व्यक्तींची घरं, बाग, यांची प्रतिकृती न केल्यास कार्डपेपरवर नावं लिहू. रस्ते कुठे कुठे जाणार आहेत? पाऊलवाटा, लहान रस्ते कोणते आहेत? हे पाहून ठरवू किंवा सराव असणल्यास आठवून ठरवू. एक मोठा कार्डपेपर लागेल. तो तयार ठेवू. आता आपण पुढच्या रविवारी भेटू. केलेलं काम मांडणी करण्यासाठी. तुमची वाडी/गल्ली/पेठ यांचा नकाशा प्रतिकृतींसह तयार करणार पुढच्या रविवारी. भेटू तर! येताना तयार केलेलं साहित्य, लहान काठ्या (केरसुणीच्या), पिना, टाचण्या, रंग असल्यास जमवून ठेवा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link