Next
आपल्या परिसराचा नकाशा
- रेणू दांडेकर
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

चला, आज खूप मस्त काम करायचंय. आपल्या परिसराचा नकाशा आपण तयार करायचाय. दिवाळीत जशी किल्ल्याची प्रतिकृती करतो तशी आपल्या वाडीची किंवा गल्लीची किंवा पेठेची प्रतिकृती तयार होणार आहे. चला, आपला कार्डपेपर जमिनीवर पसरुया. इथे अनेक कार्डपेपर एकमेकांना जोडून मोठा कार्डपेपर तयार केला तर अधिकच छान. आपण कागदासमोर बसुया. कार्डपेपर नसला तर जमिनीवर नकाशा काढुया. खडूनं किंवा रांगोळीनं. एक दिशा ठरवुया. आपण बसलोय त्यासमोरची पूर्व व आपल्या बाजूची पश्चिम. उत्तर व दक्षिण. आधी हवं तर रफ काढून घेऊ म्हणजे काही राहायचं नाही.
रस्ते, सगळी ठिकाणं, घरं हे या नकाशावर यायला हवं. रफ काढलेल्या नकाशावर तयार केलेल्या नावांच्या पाट्या लावुया. आपण गटात काम करतोय. काही राहिलं तर सुचवुया. रस्ते पेन्सिलनं काढून घेऊ. आपल्या कागदावर किती नि कसे मावणार आहे याचा अंदाज घेऊनच सगळी ठिकाणं लावायची आहेत. पुन्हा एकदा नीट निरीक्षण करून काही राहिलं नाही ना, याची खात्री करुया.
आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आजूबाजूचीही माहिती यामुळे आपल्याला होणार. नकाशा तयार झाल्यावर आपण त्या परिसरातील झाडं, झुडपं, वेली यांचीही नावं त्या त्या ठिकाणी देउया. परिसरातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयीही माहिती जमा करुया.
आपल्या परिसराच्या नकाशाची आकृती काढताना खूप मजा येईल. परिसरातील अनेक गोष्टींशी आपली पक्की ओळख होईल. काही गोष्टींबद्दल आपल्याला नीट माहिती नसते. एखादी वास्तू, एखादं ऐतिहासिक ठिकाण, एखादी महत्त्वाची इमारत, जुनं दुकान, वेगळंच झाड अशा अनेक गोष्टींची ओळख यानिमित्तानं होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link