Next
लेमन पेन्सी
- आयझॅक किहीमकर
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story


लेमन पेन्सी फुलपाखरू त्याच्या रंगामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसते. हे फुलपाखरू कधीच जंगलात आढळत नाही. ते विशेषतः रंगीत फुलं असलेल्या बागेत किंवा माळरानावर भिरभिरताना दिसते. प्रामुख्याने दुपारच्या उन्हात भटकायला या फुलपाखराला आवडते. लॅटना नावाच्या फुलातील मध हे या फुलपाखरांचे आवडते खाद्य. त्यामुळे या फुलांच्या बागेत लेमन पेन्सी वस्तीला येतात. लेमन पेन्सी नर ठरावीक प्रदेशातच वास्तव्य करणे पसंत करतात आणि त्यांच्या प्रांतात येणाऱ्या दुसऱ्या जातीच्या फुलपाखरांचा पाठलाग करणे हा त्यांचा आवडता उद्योग असतो.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link