Next
भारत-पाक महामुकाबला - ढगाळ वातावरणात गोलंदाजांची चलती
शरद कद्रेकर
Friday, June 14 | 02:15 PM
15 0 0
Share this story


भारत-न्यूझीलंड सामन्यामध्येही इंग्लंडच्या पावसाने आपले रंग दाखवले. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रविवारी होणाऱ्या महामुकाबल्याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. वातावरण असेच ढगाळ राहिल्यास खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल व त्यामुळेच नाणेफेक जिंकणारा गोलंदाजीलाच प्राधान्य देईल, असा होरा आहे.

ढगाळ वातावरणात ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक स्विंग होतो. त्यामुळे गोलंदाजी घेतल्यास पहिल्या काही षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडता येईल किंवा त्यांच्या धावांना अटकाव करणे शक्य होईल. 

खुद्द इम्रानचा आग्रह

पाकिस्तानात स्पॉटफिक्सिंगच्या आरोपाखाली अडकलेल्या महंमद अमीर या डावखुऱ्या गोलंदाजाला काहीही करून इंग्लंडच्या विश्वचषकस्पर्धेत समाविष्ट करावेच, यासाठी खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी रस घेतला होता, असे समजते. मुरब्बी इम्रान यांचा होरा खरा ठरला आणि या दौऱ्यात महंमद अमीरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० धावांमध्ये पाच बळी इतकी सरस कामगिरी त्याने केली. अमीरप्रमाणेच इमाद वसीम, वहाब रियाज, हसन अली, शदाब खान यांसारख्या गोलंदाजांवरही पाकची भिस्त राहील. 

भारताची मदार ही जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व महंमद शमी या गोलंदाजांच्या तेज त्रिकुटावर राहणार आहे. हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांचीही त्यांना साथ असेल. ढगाळ वातावरणच राहिले, तर विजय शंकरचा संघात समावेश होऊ शकतो. ज्यायोगे गोलंदाजीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहील. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link