Next
मनस्वी कलाकाराची एक्झीट
प्रशांत अनासपुरे
Monday, June 10 | 07:39 PM
15 0 0
Share this story


गिरीश कर्नाड...

जन्म १९ मे १९३८....


माथेरानच्या निसर्गरम्य कुशीत जन्मलेल्या या मनस्वी लेखकाचा चौफेर प्रवास अचंबित करून जातो. भारतीय साहित्यविश्वाला आपल्या तळपत्या लेखनीने नवी ओळख देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. गिरीश कर्नाड. ‘ययाती,‘हयवदन, ‘तुघलक,‘नागमंडल अशा मराठी नाटकांचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केलं.या नाट्यकलाकृतींमुळे आजचे युवा रंगकर्मीही भारावून जातात.


नाटकाची भाषा कशी असावी ती प्रेक्षकांपर्यंत कशी पोहचावी, कलाकारांचा अभिनय कसा असावा याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे डॉ. गिरीश कर्नाड. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मराठीत त्यांनी काही मोजक्याचं कलाकृती केल्या. मात्र त्या प्रत्येक कलाकृतीनं आपली एक वेगळी छाप उमटवली. शब्दांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या लेखणीचे अनेक दिग्गज दिग्दर्शकही चाहते होते.


नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थातएनएसडीचे  इब्राहिम अल्काजी, प्रसन्ना, पंडित सत्यदेव दुबे, अरविंद गौर, विजया मेहता असे रंगभूमीला वाहून घेतलेले नाट्यकर्मी गिरीश कर्नाड यांच्या प्रेमात होते. त्यामुळे शब्दांची जादूई किमया कागदावर उतरवून सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यामध्ये खिळवून ठेवणं हेच त्यांचं खास वैशिष्ट्य. कोणताही विषय थेटपणे मांडण्यात ते कधी घाबरले नाहीत.


बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये तुघलकआणि हयवदनहे नाटकं भाषांतरीत करण्यात आली. गिरीश कर्नाड यांची मातृभाषा ही कोकणी. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमात झालं.


पुढे कर्नाड कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाल्यामुळे त्यांनी बहुतांश लेखन हे कन्नड भाषेत केलं. ऑक्सफर्डध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या गिरीश कर्नाड यांनी शिकागो विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणूनही विद्यार्थांना धडे दिले. मात्र मायभूमीच्या ओढीने गिरीश कर्नाड भारतात परतले आणि इथल्या


नाट्यविश्वात ते रममाण झाले


शिक्षण काही कालावधी पुण्यात गेल्यामुळे बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांच्या ते प्रेमात होते. तिथेचं कदाचित त्याच्यात नाट्यलेखनाची बीज रोवली गेली. गिरीश कर्नाड यांनी मराठीशी आपली नाळ कायमच जोडून ठेवली. ‘आडाडताआयुष्य म्हणजेच खेळता खेळता आयुष्य या नावाने त्यांनी कानडी भाषेत लिहिलेलं आत्मचरित्र त्यांच्या प्रवासाची खरी कहाणी सांगून जाते.
नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट तर युनिव्हसिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियाने डि.लिट पदवी देऊन सन्मान केला. जागतिक रंगभूमीचे राजदूत म्हणून युनेस्कोनं त्यांची निवड केली होती.


गिरीश कर्नाड यांचा पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या शब्दांच्या मैफलीने वेगळ्याचं दुनियेत नेणाऱ्या या मनस्वी नाट्यकर्मीच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

अभिनयातही वेगळा ठसा 

नाटककार दिग्दर्शक साहित्यिक म्हणून गिरीश कर्नाड सर्वांना परिचित होतेच. हिंदी, मल्ल्याळम, तेलुगू, तामीळ, मराठी अशा सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या.


मात्र एक अभिनेता म्हणून त्यांनी काही मोजक्याचं पण प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. गिरीश कर्नाड म्हटलं की त्यांचा मराठी प्रेक्षकांना आठवतो तो उंबरठाचित्रपट.


१९८२ मध्ये डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठाचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात स्मिता पाटील यांचा कणखर अभिनय आणि जोडीला गिरीश कर्नाड यांचा पडद्यावरील संयमित वावर हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य ठरलं होतं. हिंदीसह मल्ल्याळम,तेलुगू,तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये गिरीश कर्नाड यांनी आपल्या अभिनयाची सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये छाप उमटवली. नाटकांवर मनस्वी प्रेम करणारे गिरीश कर्नाड चित्रपटांच्या दुनियेतही कायमच आपली एक वेगळी छाप उमटवून गेले. मग तो इक्बालसारखा चित्रपट असेल किंवा एक था टायगरसारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट असेल. बॉलीवूडच्या मसालेदार चित्रपटांमध्येही त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व जपलं. नागेश कुकुनूर दिग्दर्शित इक्बालहा चित्रपट त्याचचं एक उदाहरण म्हणता येईल.सलमान खानच्या एक था टायगरमधील त्यांची भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती.


एकमागून एक भारंभार चित्रपट करण्यापेक्षा मनाला रुचतील पटतील अशाच भूमिका करणं त्यांनी कायम पसंत केलं. मराठीतील शेवटचा चित्रपट ठरला तो सरगम.’ शिवकुमार कदम दिग्दर्शित या चित्रपटात त्यांची खास भूमिका आहे. हा चित्रपट सध्या सेन्सॉरच्या कात्रीत अडकला आहे. ‘सरगमप्रदर्शित झालातर तो त्यांचा शेवटचा चित्रपट असेल 


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link