Next
प्रयत्नांती परमेश्वर
- कांचन जोशी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा झेंडा सातासमुद्रापार रोवणारे स्वामी  विवेकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. तार्किकदृष्ट्या पटल्याशिवाय व स्वानुभवाशिवाय कोणताही विचार न स्वीकारणाऱ्या विवेकानंदांची ही गोष्ट!  रामकृष्ण परमहंसांचा थेट परमात्म्याशी संवाद आहे हे कळल्यावर विवेकानंद यांनी त्यांना ‘देव माझ्याशी केव्हा बोलेल?’ असे विचारायला सुरुवात केली. एकदा रामकृष्ण परमहंस स्नानासाठी नदीवर गेले असताना विवेकानंदही त्यांच्या पाठोपाठ गेले. पुन्हा विचारू लागले- “देव माझ्याशी केव्हा बोलेल?”
परमहंसांनी दोन्ही हातांनी त्यांचे डोके पाण्याखाली दाबून ठेवले. काही केल्या त्यांना वर येता येईना. मग परमहंसांनी डोके सोडून दिले. विवेकानंद चक्रावले. तेव्हा परमहंस म्हणाले, “पाण्यात असताना ज्या तीव्रतेनं तुला पाण्याबाहेर यावं असं वाटत होतं त्याच तीव्रतेनं तुला परमेश्वर माझ्याशी बोलला पाहिजे असं वाटेल. आणि ज्या तीव्रतेनं तू पाण्याबाहेर येण्यासाठी प्रयत्न केलेस त्या तीव्रतेनं देव बोलावा म्हणून तू प्रयत्न करशील, तेव्हा देव तुझ्याशी नक्की बोलेल.”
यानंतर गुरूंचे वाक्य प्रमाण मानून विवेकानंदांनी तसे प्रयत्न सुरू केले. हा मार्ग स्वीकारताना त्यातल्या कष्टांची जाणीवही त्यांना होती. म्हणूनच त्यांनी कठोपनिषदातल्या पुढील श्लोकाचा सतत पुरस्कार केला-


उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत |
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यता दुर्गं
पथकस्तत्कवयो वदन्ति ||


[उठा, जागे व्हा आणि जाणकार विद्वानांकडून ज्ञान मिळवा. ज्ञान मिळावं अशी इच्छा असणाऱ्या लोकांचा मार्ग धारदार सुरीवरून चालण्याएवढा कठीण असतो. ]
ध्येय ठरलेले असेल तर मार्ग कठीण असला तरी तो चालण्याचे बळ मिळतेच. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतेच ज्ञान मिळणे अशक्य!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link