Next
नोकरी शोधताय?
विशेष प्रतिनिधी
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पंचायत सेक्रेटरी, व्हीआरओ व इतर पदांसाठी मेगाभरती

आंध्र प्रदेश सरकारतर्फे पंचायत सेक्रेटरी, व्हीआरओ व इतर १,६०,००० पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. त्याचे तपशील पुढे दिले आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख- १५ ऑगस्ट २०१९
पदांची नावे – पंचायत सेक्रेटरी, व्हीआरओ, एमपीइओ, गोपाळमित्र, लाइव्ह स्टॉक असिस्टंट, एएनएम, इलेक्ट्रिकल असिस्टंट, ग्रामीण इंजिनीयर, वेलफेअर असिस्टंट, वुमेन पोलिस अटेंडंट, डिजिटल असिस्टंट.
शैक्षणिक अर्हता-
इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०+२ किंवा त्याच्याशी संलग्न अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा- १८ ते ३९ वर्षे
निवडप्रक्रिया - पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वार केली जाईल.
अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम आंध्र प्रदेश सरकारच्या gramasachivalayam.ap.gov.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर ‘One Time Profile Registration (OTPR)’ या पर्यायावर क्लिक करून आपले सर्व तपशील भरा व नोंदणी पूर्ण करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर होमपेजवर पुन्हा येऊन ‘Submit Online Application’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करा. त्यानंतर ओपन झालेल्या नवीन पेजवरून तुमच्या आवडीच्या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘Apply’ या पर्यायावर क्लिक करून पूर्ण करा.

‘एफसीआय’मध्ये
जनरल मॅनेजर व्हा!


फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘एफसीआय’तर्फे जनरल मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख –
१९ ऑगस्ट २०१९
पदांची संख्या-
जनरल मॅनेजर – ०२ पदे
पात्रतेचे निकष-
इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी असावी. त्याला सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा किमान १० वर्षांचा अनुभव असावा. औद्योगिक स्थापना / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या अभियांत्रिकी विभागाचा स्वतंत्र कार्यभार असलेले आणि प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणीचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
नोकरीचे स्थान-
दिल्ली / एनसीआर, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटी.
निवडप्रक्रिया-
इच्छुक व पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह  ‘कार्यकारी संचालक (कर्मचारी), भारतीय खाद्य महामंडळ, मुख्यालय, १६-२० बाराखंबा लेन, नवी दिल्ली -११०००१’ या पत्त्यावर पाठवावेत.
---------
वननिरीक्षक (फॉरेस्ट वॉचर) व्हा
तामिळनाडू फॉरेस्ट युनिफॉर्मड सर्व्हिसेसतर्फे वननिरीक्षक (फॉरेस्ट वॉचर) या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख-
१० ऑगस्ट २०१९.
पदांची संख्या-
फॉरेस्ट वॉचर – ५६४
शैक्षणिक अर्हता-
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी व १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे असावे.
निवडप्रक्रिया-
ऑनलाईन परीक्षा, प्रमाणपत्र पडताळणी, शारीरिक मानकांची पडताळणी आणि सहनशक्ती चाचणीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम forests.tn.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर करिअर विभागात क्लिक करा. पुढे ‘TN Forest (TNFUSRC) Recruitment 2019 for Forest Watcher Posts’ यावर क्लिक करून अर्ज भरा. अर्जाचे शुल्क (रु. १५० + सेवा शुल्क) भरा व Submit वर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा. n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link