Next
विक्रांतचा भूतकाळ उलगडणार!
विशेष प्रतिनिधी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’मालिकेने थोड्याच काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. वय विसरायला लावणारी आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेतील कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आले आहे.
या मालिकेतील नायक अर्थात विक्रांत सरंजामे याच्या भूतकाळातील धागे हळूहळू उलगडले जात आहेत. त्या भूतकाळाचा एक धागा म्हणजे जालिंदर! विक्रांत संरजामेचा कट्टर विरोधक असलेल्या जालिंदरचा मालिकेत प्रवेश झाला असून विक्रांतला संपवण्यासाठी तो कट रचत आहे. त्या कटात ईशाला एक प्यादे म्हणून वापरत आहे. जालिंदर ईशाच्या मनात विक्रांतविरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जालिंदरच्या येण्यामुळे ईशा आणि विक्रांत एकमेकांच्या अधिक जवळ आले आहे. विक्रांतलाही ईशाबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे. जालिंदरच्या येण्यामुळे या दोघांमधील प्रेम, विश्वास अधिक दृढ होतो की जालिंदर त्यांचे हे नाते संपवण्यात यशस्वी होतो, हे येत्या काही दिवसांत कळेलच…
दरम्यान, कथानकात जालिंदरच्या येण्यामुळे विक्रांत आणि ईशाची ही प्रेमकहाणी लवकरच पुढच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. विक्रांत ईशाकडे त्याचे प्रेम व्यक्त करणार आहे. विक्रांत आपले ईशावरील प्रेम एका खास अंदाजात व्यक्त करणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा विशेष भाग प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे विक्रांत ईशाला कशा पद्धतीने प्रपोज करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आणखी एक ट्विस्ट
जालिंदरच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. जालिंदररूपी अडचण पार करून विक्रांत ईशाचे मन कसे जिंकणार हे पाहणे कमालीचे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातच आता मालिकेत एक नवे पात्र येणार आहे.  हे पात्र म्हणजे  विक्रांत सरंजामेची पहिली पत्नी!
मालिकेच्या शीर्षकगीतात एक सावली दिसते… ही सावली कुणाची असा प्रश्न प्रेक्षकांना पहिल्या भागापासूनच पडला आहे. आता विक्रांत सरंजामेच्या पत्नीची स्पष्ट ओळख प्रेक्षकांना होणार आहे. ही भूमिका शिल्पा तुळसकर साकारत असल्याची जोरदार चर्चा आहे. डिसेंबरच्या अखेरीस या पात्राची मालिकेत एंट्री होणार आहे.  या नव्या पात्राच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकात ट्विस्ट येणार हे नक्की!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link