Next
पंडित रामप्रसाद बिस्मिल
- प्रज्ञा जोशी (संस्कार भारती)
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात पंडित रामप्रसाद बिस्मिल यांचे नाव मोठे आहे. हिंदी-उर्दू कवी, इतिहासकार, भाषांतरकार असणाऱ्या रामप्रसाद बिस्मिल यांनी अवघ्या तिसाव्या वर्षी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या साहित्याने देशातील लोकांच्या मनात देशप्रेम जागृत केले होते. जहाल क्रांतिकारी पंडित रामप्रसाद सशस्त्र क्रांतीसाठी लागणाऱ्या पैशांची गरज स्वत: लिहिलेली पुस्तके विकून भागवित असत. पण तरीही पैशांची गरज पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी इंग्रज सरकारचा खजिना ताब्यात घेण्याची योजना आखली. ‘काकोरी कांड’ या नावाने ही घटना इतिहासात प्रसिद्ध आहे.
इंग्रजांचा खजिना घेऊन जाणारी ट्रेन त्यांनी लखनौ शहराजवळील काकोरी येथे चेन खेचून थांबवली. त्यातील पोलीस पहारा भेदून, पैसे असणारी संदूक (पेटारा) ताब्यात घेतली. भारतीयांचा पैसा भारतमातेला  स्वतंत्र करायच्या कामी वापरला. केवळ दहा साथीदारांच्या मदतीने त्यांनी हे काम केले.
या कार्यात त्याना चंद्रशेखर आझाद व अशफाकउल्ला खान यांनीही साथ दिली होती. यापूर्वीही मैनपुरी कटात ते सामील होते. त्यावेळी ते  निसटून  भूमिगत झाले होते. पण यावेळी मात्र बनवारीलाल या फितुरामुळे यापैकी चार जण पकडले गेले. इंग्रज सरकारच्या कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोरखपूर येथील तुरुंगात ती अमलात आणली गेली.
आर्यसमाजी, ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या, देशभक्तीच्या कविता लिहिणाऱ्या पंडित रामप्रसाद बिस्मिल यांचे हे अनमोल बलिदान आहे. त्यांच्या प्रखर देशप्रेमाची साक्ष असलल्या त्यांच्या प्रसिद्ध काव्यपंक्तींनीच ही कथा संपवूया-
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है|
देखना है जोर कितना बाजुएं कातिल में है|
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link