Next
मूगडाळीच्या गोळ्यांची कढी
वसुधा गवांदे
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


मे महिन्याची उष्णता ताकाने भागवल्यावर, पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. पावसाळा सुरू झाला की ताक पिण्याची सवय हळूहळू मोडावी लागते. अशा वेळी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी गरमागरम भातासोबत मूगडाळीच्या गोळ्यांची कढी तर आपण बनवलीच पाहिजे.
मूगडाळीच्या गोळ्यांची कढी बनवण्यासाठी मूगडाळ तीन-चार तास भिजत ठेवावी. त्यानंतर निथळून घ्यावी व पूर्ण कोरडी झाल्यावर त्यात पाव इंच आलं, पाव चमचा जिरं, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, किंचित साखर आणि चिमूटभर हिंग घालून मिक्सरमधून वाटून घ्यावी. थोडी जाडसर वाटावी. त्याचे छोटे छोटे गोळे करावेत.  आता कढीसाठी दोन वाट्या आंबट ताक घेऊन त्यात आल्याचा तुकडा, हिरवी मिरची आणि जिरं ठेचून घालावं. त्यातच बेसन, चवीपुरतं मीठ, साखर, कढीलिंबाची पानं आणि हळद घालावी.  फोडणी करून त्यावर हे मिश्रण ओतावं. कढीला उकळी आली की एकेक गोळा त्यात सोडावा. गॅस मंद ठेवावा आणि पुन्हा उकळी येऊ द्यावी. गोळे असल्याने कढी फुटत नाही. वरून कोथिंबीर घालावी आणि गरम गरम कढी प्यायला द्यावी. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ताक उरतं. या दिवसात सकाळ-संध्याकाळ ताक प्यायला लोक कचरतात. अशावेळी त्या ताकाची मूगडाळीचे गोळे घालून केलेली कढी मस्त लागते.  सगळे आवडीने पितात. शिवाय भातासोबतही खाता येते. तेव्हा नक्की करून बघा. मूगडाळीप्रमाणेच चणाडाळ वाटून त्याचेही गोळे करता येतात. पूर्वी अशी कढी सणावाराला एक वेगळा पदार्थ म्हणून केली जायची. आजकाल ती पद्धत मागे पडत चालली आहे. परंतु ही कढी इतकी चविष्ट होते की त्यासाठी सणावाराची वाट पाहायची गरज नाही!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link