Next
प्रतिसाद
अशोक वाधवाणी, अनिल ह. पालये, प्रभाकर मोडक
Friday, January 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story

लघुकथा असावी
‘झी मराठी दिशा’चा दि. २९ डिसेंबरचा अंक वाचला. हा नववर्षाचा एक उपहारच आहे, असे म्हणायला हरकत नाही. अगदी नाममात्र मूल्यामध्ये मिळणारे हे आठवडापत्र नसून पत्रिकाच आहे. कारण यात प्रत्येक वाचकवर्गासाठी वाचनीय असे अतिशय उत्तम साहित्य आहे. संपूर्ण अंक उत्कृष्ट आहेच, फक्त माझा एक सल्ला आहे, की प्रत्येक आठवड्यात किमान एक लघुकथा असावी. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये २०-२० ही पद्धत रूढ व लोकप्रिय ठरली आहे, त्याचप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये लघुकथांचे मोठे व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे हा वारसा जपणारी किमान एक लघुकथा प्रत्येक अंकात असावी, हीच अपेक्षा आहे.        अशोक वाधवाणी, कोल्हापूर

प्रत्येकाला वाचनाची सवय लागली!
मी ‘झी मराठी दिशा’च्या पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. या अंकाचा आकार जुन्या अंकाची आठवण करून देणारा असला तरी जास्त मजकूरचा समावेश होत असल्याने हाच आकार कायम असू द्यावा. प्रत्येक पानावरील सुविचार मला खूपच भावतात. त्या प्रत्येकात विविधता, वेगळेपण व बोध घेण्याची प्रेरणा असते. प्रसाद भडसावळेंच्या आठवडा-नोंदींमुळे आगामी आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांची आगाऊ माहिती मिळते. त्याच पानावर काही ताज्या घडामोडी असाव्यात असे वाटते. तसेही काही ताज्या घडामोडींचे पहिल्या पृष्ठावर वृत्तांकन असते, हे विशेष कौतुकास्पद आहे. खरे सांगायचे तर वर्तमानपत्रांतील नकारात्मक बातम्या वाचून कंटाळा आला होता, परंतु ‘झी मराठी दिशा’च्या रूपाने सकारात्मक बातम्यांचा खजिना मिळाल्याने आता वर्तमानपत्रांचा विसर पडला आहे. या आठवडापत्राच्या वाचनाने सकारात्मकतेने जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. ‘झी मराठी दिशा’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसंगानुरूप विविध विषयांवरील लेखांचा विशेषविभागाचा समावेश असणे. त्याचप्रमाणे सुरेश खरे, दिलीप चावरे, मिलिंद आमडेकर यांची सदरे, खेळांगणमधील लेख, आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणारे सदर, रंजन-गुंजन, बालकिशोर, तारुण्य इत्यादी सदरांतील मान्यवरांचे सर्वच लेख अत्यंत वाचनीय असतात. ‘झी मराठी दिशा’मुळे घरातील प्रत्येकाला वाचनाची सवय लागली आहे. त्यामुळे हे  आठवडापत्र वर्तमानपत्राची जागा घेणारे आहेच, शिवाय ते मराठीभाषिकांना वाचनाशी जोडणारे आहे.        
 अनिल ह. पालये, बदलापूर

ज्ञानवर्धक आणि मनोरंजकही
पहिल्या अंकापासूनच मी ‘झी मराठी दिशा’चा नियमित वाचक आहे. हे आठवडापत्र नावाप्रमाणे नव्या तजेल्याचे आहे. याचे वर्णन ‘सर्वव्यापी, ज्ञानवर्धक, मनोरंजक’ या तीन शब्दांनी करता येऊ शकते. प्रत्येक अंकातील प्रत्येक लेख इतका वाचनीय असतो की मी हातात घेतल्याघेतल्या संपूर्ण अंक एकाच वेळी वाचून काढतो. या आठवडापत्राची यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहील यात शंका नाही.
-प्रभाकर मोडक, अलिबाग 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link