Next
शोधुया आकड्यांना
- रेणू दांडेकर
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मित्रांनो, आपल्याला वाटते गणित हा विषय आहे आणि तो फक्त पुस्तकात असतो. बऱ्याच वेळा हा विषय आपल्याला अवघड वाटतो किंवा या विषयाचे दडपणही येते. त्यामुळे बेरीज चुकते, हातचा धरायचा राहतो, वजाबाकी चुकते, पाढे आठवत नाहीत. म्हणूनच आपण एक गंमत करू. गणित पुस्तकात नसते तर अवतीभवतीही आपल्याला आकडे दिसतात. माणसे बेरीज, वजाबाकी करत असतातच. आपण आता फक्त आकडे कुठे कुठे दिसतात ते आठवून सांगणार आहोत.
आपण गोल करून बसू. सगळे मिळून म्हणुया- “सांगा सांगा, लवकर सांगा, आकडे कुठे दिसताहेत ते लवकर सांगा. सांगा सांगा.” आता प्रत्येकजण स्वतंत्रपणे आकडे कुठे दिसताहेत ते सांगेल. तो म्हणेल, “सांगतो, सांगतो. लवकर सांगतो. आकडे कुठे दिसताहेत ते लवकर सांगतो.” समजा, तुम्हाला गाडीचा नंबर सांगायचाय कारण त्यात आकडे आहेत. तर तुम्ही म्हणणार, “आमच्या गाडीचा नंबर .............. आहे.” पुन्हा सगळे जण गोलात म्हणतील, “सांगा, सांगा, लवकर सांगा...” इथे तुम्ही कुठल्या वस्तूची किंमत, मोबाइल नंबर, शर्टाला बटणे किती, वहीला पाने, खिडकीचे गज अशा अनेक ठिकाणी आकड्यांचा, अंकांचा संबंध येतो.
चला विचार करू, निरीक्षण करू आणि कुठे कुठे अंक दिसताहेत ते सांगत सांगत गोलात बसून मजा करू. इतकी मजा येईल की तुम्ही कल्पनाही केली नसेल. किती ठिकाणी आकड्यांचे अस्तित्व जाणवेल तुम्हाला! हा खेळ खेळून बघाच.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link