Next
बंडखोर सेवाव्रती
स्टॅन्ली गोन्सालविस
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

तेरेसिटा रिबेलो व जेरोम गोन्सालविस या वसईच्या दोन मुलींनी संसारसुखाकडे पाठ फिरवून जनसेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘प्रेषितांची राणी’ या ख्रिस्ती भगिनीसंघात प्रवेश घेतला अनुक्रमे १९६५ ते १९७३ साली. तिथे सिस्टर तेरेसिटांनी परिचारिकेचे; तर सिस्टर जेरोमनी समाजसेविकेचे विशेष प्रशिक्षण घेतले. या संघातर्फे त्यांनी भारतात विविध ठिकाणी, तसेच परदेशातही रुग्णसेवा, महिलाविकास, मुलांचे शिक्षण असे सेवाकार्य केले, पण काही कारणांमुळे त्यांचा जीव तिथे रमत नव्हता. कॉन्व्हेंटच्या भिंतीपलीकडचे दीनदलित व वंचित जग जणू त्यांना हाक घालत होते. एकाच संघात असूनही या दोघींची कधी गाठभेटही झाली नव्हती. मात्र, योगायोगाने त्या दोघींची बदली भाईंदर येथील उत्तन गावात झाली. दोघींचे सूर जुळले.
उत्तनमधील तीन दवाखान्यांतून त्या गोरगरिबांना वैद्यकीय सेवा पुरवू लागल्या. दरम्यान त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये घडलेल्या काही अप्रिय घटनांबद्दल त्यांच्या वरिष्ठांनी सिस्टर तेरेसिटा व त्यांच्या साहाय्यक सिस्टर जेरोमवर ठपका ठेवला. आपल्या जीवतोड मेहनतीचे कौतुक होण्याऐवजी मानहानी व चुकीचा आळ याचे त्यांना अतोनात दुःख झाले.
ख्रिस्ती भगिनीसंघ हे आपली दिनचर्या, शिस्तपालन, चारित्र्य, सेवा, कामकाज व नियमांच्या बाबतीत अतिशय काटेकोर व दक्ष असतात. तेथील जीवन हे बंदिस्त स्वरूपाचे असते. भगिनींकडून संपूर्ण वचनबद्धता अन् समर्पितता अपेक्षित असते. वरिष्ठांच्या आज्ञापालनाची बांधिलकी जपणाऱ्या या दोघींची त्या वातावरणात कुचंबणा व कोंडमारा होऊ लागला. शेवटी एके दिवशी त्यांनी वरिष्ठांकडे दीर्घ मुदतीची रजा मागितली आणि कॉन्व्हेंटच्या उंबरठ्यावरून बाहेरच्या जगात पाऊल टाकले.
भगिनी संघामध्ये अशा प्रकारचे स्वेच्छारजेचे चोचले पुरवले जात नाहीत. तिथे अधिकृत रजा फार कमी असते. त्यामुळे घर सोडून जोगीण बनलेली ख्रिस्ती स्त्री अधिकृत रजेवर घरी येते, तेव्हा तिचे जंगी स्वागत होते, मात्र जोगिणीने कायमचे घरी परतायचे ठरवले तर तिची अवस्था उपऱ्यासारखी होते.
या दोघींना घरी परतायचे नव्हते, तर स्वतंत्र घर वसवायचे होते! प्रत्यक्षात अथांग आकाशाखालील उघड्या जगात घरदार नसलेल्यांचा निभाव लागणे किती कठीण असते, जागोजागी दबा धरून बसलेल्या बुभुक्षितांच्या नजरांपासून स्वत:ला वाचवणे किती जिकिरीचे असते, हे त्या मध्यमवयीन जोगिणींना जाणवले. १९८९ साली कॉव्हेंट सोडल्यानंतर त्या जागेच्या शोधात हिंडत असतानाच एका हिंदू व्यक्तीने त्यांची विचारपूस केली. मुंबई-आग्रा रोडवरील कोशिंबी (पडघा, भिवंडी) येथील तीन गुंठे जागा त्यांना देऊ केली. तिथे दोन खोल्यांचे कच्चे बांधकाम करून सिस्टरनी ‘ज्योती सेवासंघ’ हा दवाखाना सुरू केला. मात्र त्या जमीनव्यवहारात त्या व्यक्तीने सिस्टरची दिशाभूल केली होती. मूळ जमीन दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर होती. दोन लाख रुपये द्या, नाहीतर जागा सोडा, असे तो धमकावू लागला. पुढे सिस्टरना मारण्यासाठी त्याने एका मुसलमान व्यक्तीला सुपारी दिली. विशेष म्हणजे, त्याच मुसलमानाने स्वतः येऊन सिस्टरांना धोक्याची कल्पना दिली! त्याही पुढील योगायोगाची घटना म्हणजे त्याच रात्री दोन वाजता जमीनमालकाची मुलगी दवाखान्यात आली आणि आपले वडील अत्यवस्थ असल्याने सिस्टरना घरी येण्यासाठी विनवू लागली. सिस्टरपुढे मोठा पेच निर्माण झाला.
रात्रीच्या वेळी दूरवरच्या गावात गेल्यास दगाफटका होण्याची शक्यता होती. दुसरीकडे रुग्णसेवेचे कर्तव्य टाळता येत नव्हते. शेवटी हिय्या करून त्या रात्रीच्या अंधारात बाहेर पडल्या. तो माणूस खरोखरीच आजारी होता. सिस्टरनी त्याच्यावर उपचार केले. ज्याने मारेकरी पाठवले होते, त्याला जीवदान मिळाले. नंतर त्या माणसाला उपरती झाली. त्याने सिस्टरना सांगितले, “सिस्टर, तुम्ही इथून कुठेही जायचे नाही!”
पुढे तो जमीनव्यवहार सामंजस्याने सोडवण्यात आला. सिस्टरचे कार्य पाहून मुंबईच्या एका दानशूर इसमाने त्याची लगतची दोन एकर जागा या दोघींना देऊन टाकली. मनाला उभारी देणाऱ्या अशा घटना घडत होत्या, तरी अडचणी अनंत होत्या. त्या दोन खोल्या हाच त्यांचा दवाखाना व निवासस्थानही होते. अनेक वर्षे त्या घरात वीज नव्हती. चर्चमध्ये वाहिलेल्या मेणबत्त्या आणून त्यांची रात्र उजळायची. फरशीवर अंथरुण टाकून झोपायचे. (आजही त्या तशाच झोपतात!) भोवताली जंगल असल्याने साप, विंचूही भेटीला यायचे. डोक्यावर कळशी घेऊन दूरवरच्या विहिरीवर पाण्यासाठी जावे लागायचे. कपडे धुण्यासाठी दोन-अडीच किलोमीटरवरील नदीवर, तर शौचाला इतर गावकऱ्यांसारखे शेता-बांधावर असा दिनक्रम चालू होता.

रोजचा खर्च, औषधे यासाठी त्यांना हितचिंतकांचे उंबरठे झिजवावे लागत. डॉक्टरांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत. याबरोबरच परिसरातील गावांत त्या फिरू लागल्या. आदिवासी तसे बुजरे असतात. त्यात या कोणी धर्मांतर करण्यासाठी आल्या असाव्यात म्हणून ते त्यांच्यापासून दूर राहत. परंतु त्या नेटाने लोकांचे प्रश्न, गरजा समजावून घेऊ लागल्या. त्यांचे सण, उत्सव, लग्नात सहभागी होऊ लागल्या. त्यांच्याबरोबर खाऊ-पिऊ लागल्या; तसे ते लोक जवळ येऊ लागले.
सिस्टरांनी तेथील मुलांसाठी बालवाडी सुरू केली. महिलामंडळे, बचतगट स्थापन केले. कुपोषण व त्यापायी होणारे आजार ही तेथील मोठी समस्या होती. सिस्टरनी डॉक्टर, औषधपुरवठादारांच्या गाठीभेटी घेतल्या. आता डॉ. लेस्ली गोन्सालविस, डॉ. जोसेफ डिसोझा (वसई), डॉ. निजाई (कळंब), डॉ. टोनी फर्नांडिस (मालाड), डॉ. भांगरे, डॉ. बॉस्को असे डॉक्टर तिथे येऊन विनामूल्य सेवा देत आहेत.
१९९५ सालची घटना. मुंबई-आग्रा रोडवर एका कार व ट्रकचा अपघात घडला. अपघातात एक माणूस गंभीर जखमी झाला; तर दुसऱ्या दोन जखमींना भयंकर मानसिक धक्का बसला होता. सिस्टर मदतीसाठी धावल्या. वाहने आजूबाजूने न थांबता पळत होती. सिस्टरांनी पोलिस, अॅम्ब्युलन्सला फोन केले. कोणीही आले नाहीत. त्या अत्यवस्थ माणसाने प्राण सोडले. सिस्टरांनी दुसऱ्या दोघांना आपल्या दवाखान्यात आणून उपचार केले. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दिला. त्या अपघातग्रस्त कारमधील सर्वजण नाशिकच्या ग्लॅक्सो कंपनीचे अधिकारी होते. सिस्टरांचे हे दयाकृत्य पाहून कंपनीने त्यांना महिंद्र जीप भेटीदाखल दिली. एक पेट्रोलपंप मालक त्यांना दरमहा वीस लिटर डिझेल; तर दुसरा एक मालक दरमहा दहा लिटर डिझेल मोफत देऊ लागला. सिस्टर म्हणतात, “परमेश्वर चांगल्या कामाची परतफेड अशा तऱ्हेने करत असतो. मानवधर्माला जागून निरपेक्ष वृत्तीने काम करत राहायचे.”
त्यांच्या कामाचा पसारा वाढू लागला. अनाथ, बेघर, कचराकुंडीत टाकून दिलेली, व्यसनाधीन पालकांची मुले त्यांच्याकडे सोपवली जाऊ लागली. ही संख्या वाढत जाऊन आज त्यांच्या छत्राखाली ३० मुले-मुली शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहत आहेत. या प्रत्येकाची एक शोककहाणी आहे. धर्माच्या वेशीपलीकडे पाहणाऱ्या या जोगिणी आपल्या अंगणात सर्वधर्मीय पारिजातकाचा वृक्ष लावून त्याचा गंध सर्वत्र दरवळावा या हेतूनेच काम करीत आहेत. तेथील एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या देणगीतून त्यांच्या मनीचे एक मोठे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे- ‘सत्संग आंतरधर्मीय सुसंवाद केंद्राची’ इमारत त्यांच्या जागेत उभी राहिली असून ती सर्वधर्मीयांसाठी खुली आहे. तिथे कोणीही धार्मिक, शैक्षणिक शिबिरे, सामाजिक उपक्रम, ध्यानसाधना, तप, मनन-चिंतन अथवा कुटुंबासह दोन दिवसांचे निव्वळ विरंगुळ्याचे क्षण उपभोगू शकतो. अगदी अल्पदरात ही सेवा त्या उपलब्ध करून देतात व तो निधी मुलांच्या संगोपनासाठी उपयोगात आणतात.
आज सिस्टर तेरेसिटा ७२, तर सिस्टर जेरोम ६७ वर्षांच्या आहेत. या वयात या दोघी पायाला चाके लावून पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करत असतात.

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link