Next
श्रेयसचा जलवा
विशेष प्रतिनिधी
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आयपीएलच्या १२व्या सीझनमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांत लेगस्पिनरमध्ये  वेगळेपणाने उठून दिसतोय तो राजस्थान रॉयल्सचा श्रेयस गोपाल!
२५ वर्षीय श्रेयस गोपाल मूळचा बंगळुरूचा. दोन वेळा रणजी करंडकविजेत्या कर्नाटक संघात प्रत्येक वेळी त्याचा समावेश होता. उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने लेगब्रेक टाकणारा श्रेयस चार वर्षे मुंबई इंडियन्सकडूनदेखील खेळला. अतिशय मर्यादित संधी या कालावधीत त्याला तेथे मिळाल्या. अखेर गतवर्षी तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला व यशस्वीदेखील झाला. आयपीएलच्या या सीझनमध्येही तो सुरुवातीपासून फॉर्ममध्ये आहे. आरसीबीविरुद्ध त्याने आपल्या अप्रतिम गुगली गोलंदाजीने कोहली व डीव्हिलिअर्सच्या विकेट्स मिळवल्या. कोहलीची विकेट घेणारा गुगली तर भन्नाट होता. विशेष म्हणजे गतवर्षीसुद्धा त्याने आरसीबीविरुद्ध एकाच डावात या दोन्ही दिग्गज फलंदाजांच्या विकेट घेतल्या होत्या.
श्रेयसबद्दल बंगळुरूस्थित ‘कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट’चे प्रमुख, त्याचे प्रशिक्षक इरफान सैत यांच्याशी खास बातचीत केली. श्रेयस या क्रिकेट अकादमीत वयाच्या ११व्या वर्षांपासून शिकतोय. इरफान व श्रेयसचे वडील गोपाल रामस्वामी हे एकदम चांगले मित्र. श्रेयसचे वडीलदेखील चांगले लेगस्पिनर होते. इरफान सांगतात, ‘श्रेयस स्वतः तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा फलंदाजसुद्धा आहे. मात्र त्याला वरच्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत.’ प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ३५च्या आसपास आहे. चार शतकेदेखील त्याच्या नावावर जमा आहेत. सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने प्रतिविकेट ११.१६ धावा दिल्या आहेत तर इकॉनॉमी रेट आहे ५.५८ धावांचा. श्रेयस लो प्रोफाइल राहणे पसंत करतो. त्याचे वागणे, बोलणे पाहिल्यावर त्याचा रोल मॉडेल राहुल द्रविड असावा, असे सहज वाटते, तर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरदेखील काहीसा कुंबळेचा प्रभाव जाणवतो. श्रेयसला वाचनाची खूप आवड आहे, तेवढेच कुत्र्यांबद्दल त्याला ममत्व आहे. इरफान सैत उच्च शिक्षित असे क्रिकेटप्रशिक्षक आहेत. त्यांनी भारतातून लेव्हल वन, ऑस्ट्रेलियातून लेव्हल टू तर इंग्लंडमधून लेव्हल थ्रीचे प्रशिक्षकासाठीचे प्रशिक्षण घेतले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link