Next
तुमच्या फोनवर कॅमस्कॅनर आहे?
अमृता दुर्वे
Friday, September 06 | 02:45 PM
15 0 0
Share this story


फोनच्या कॅमेऱ्याचा वापर जसा फोटो काढायला होतो, तसाच अनेक गोष्टींचे विशेषतः कागदपत्रांचे फोटो काढून ठेवण्यासाठी होतो. किंवा फोनकॅमेरा स्कॅनरसारखा वापरला जातो.
यासाठीचं एक लोकप्रिय अॅप म्हणजे ‘कॅमस्कॅनर.’ २०१० पासून हे अॅप उपलब्ध आहे.
अॅण्ड्रॉइडवर याचे १०० मिलियनपेक्षा जास्त डाऊनलोड झाले होते. पण याच कॅमस्कॅनरद्वारे मालवेअर पसरल्याचं आता उघडकीला आलंय. हे अॅप वापरणाऱ्यांना या मालवेअरच्या मदतीनं काही जाहिराती दाखवण्यात आल्या वा त्यांची लॉग-इनविषयक माहिती पाहण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शंका आहे.
कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीनं हे प्रकरण उघडकीला आणलं. कॅमस्कॅनर हे अॅप जरी योग्य असलं तरी त्यामध्ये आढळलेला मालवेअर कोड हा या अॅपवर जाहिराती दाखवणाऱ्या तिसऱ्या कोणीतरी  टाकल्याचं सांगण्यात आलंय.
या सगळ्यानंतर आता गुगल प्ले स्टोअरमधून या कॅमस्कॅनर अॅपचं फ्री व्हर्जन काढून टाकण्यात आलेय.

तुमच्याकडे कॅमस्कॅनर आहे का?
या अॅपचं नवीन फ्री व्हर्जन डाऊनलोड होणार नाहीत. मग आता प्रश्न उरतो की ज्यांच्या फोनवर आधीपासूनच हे अॅप आहे, त्यांनी काय करायचं?
अनेक जण आपल्या फोनवरच्या अॅपसाठी ‘ऑटोमॅटिक अपडेट’चा पर्याय निवडतात. म्हणजे अॅपचा अपडेट उपलब्ध झाला तर हे अॅप आपोआप, ताबडतोब
अपडेट होतं.
जर तुम्हीही तुमच्या अॅपसाठी हा पर्याय निवडला असेल तर मग शक्यता आहे की तुमच्या फोनवरच्या कॅमस्कॅनरमध्येही हे मालवेअर आलेलं आहे.
कॅमस्कॅनरच्या ५.११.७ व्हर्जनमध्ये हे आढळलेलं आहे.
काहीही असलं तरी सध्याच्या घडीला हे अॅप फोनवरून काढून टाकलेलंच उत्तम.
या अॅपची नवीन, सुरक्षित आणि चाचण्या करण्यात आलेलं व्हर्जन उपलब्ध झालं की पुन्हा एकदा हे अॅप डाऊनलोड करता येईल किंवा या अॅपसारखंच काम करणारी इतर अॅप्सही तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये मिळू शकतील.
यासोबतच एखादं अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि तुमच्या फोनवर कोणतं मालवेअर इन्स्टॉल करण्यात आलेलं नाही ना, हे तपासून घ्या.
प्ले स्टोअरला अनेक उत्तम अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर अॅप्स उपलब्ध आहेत.
आणखी एक महत्त्वाचं - जर तुम्ही मोबाइल बँकिंग अॅप वापरत असाल तर त्यासाठीचे पासवर्ड्स बदलणंही गरजेचं आहे.
 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link