Next
नागपूर ते मुंबई व्हाया डोंबिवली
विशेष प्रतिनिधी
Friday, June 21 | 03:30 PM
15 0 0
Share this story


रोहितचा जन्म नागपूरमधील बनसोड गावात झाला. त्याचे वडील गुरुनाथ हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये केअरटेकर म्हणून काम करायचे. त्याची आई विशाखापट्टणम येथील आहेत. रोहितच्या मोठ्या भावाचे नाव विशाल. अत्यंत बिकट स्थितीत त्यांची गुजराण होत होती. रोहित व त्याचे कुटुंब डोंबिवलीत एका छोट्या घरात राहत असे. त्याच्यातील क्रिकेटच्या आवडीला त्याच्या आजोबांनी आणि काकांनी पाठिंबा दिला व तेथूनच एका सामान्य मुलाचा महान क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला. त्याच्या काकांमुळे त्याला क्रिकेटचा खर्च करता आला. रोहितने १९९९ मध्ये दिनेश लाड यांच्याकडे सराव सुरू केला. त्यानंतर लाड यांच्या सल्ल्यानुसार रोहितने शाळा बदलली, जिथे लाड प्रशिक्षण देत होते. रोहितला शिष्यवृत्तीदेखील मिळाली व त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल पडले. एक ऑफस्पिनर म्हणून त्याने नाव कमावायचे ठरवले होते, मात्र लाड यांना त्याच्यात महान फलंदाज बनण्याचे गुण दिसले, म्हणूनच त्यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्याची परिणिती म्हणजे भारतीय संघाला विराट कोहलीच्या पाठोपाठ एक अफलातून फलंदाज गवसला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link