Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, August 30 | 02:15 PM
15 0 0
Share this story

जागतिक छायाचित्रदिनाचा विशेषांक माहितीपूर्ण


चार लेखांद्वारे छायाचित्रणाची उत्तम माहिती ‘झी मराठी दिशा’च्या १७ ऑगस्टच्या अंकातून वाचकांपर्यंत पोचवली. छायाचित्र म्हणजे तो क्षण, तो काळ चिरंतन व जिवंत राहतो येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी. आज आम्हाला इतिहास व संस्कृती व्यवस्थित समजायला मदत होते अशा अनेक दुर्मिळ छायाचित्रांमधूनच. छायाचित्रणकला सामान्यांच्या आवाक्यात आली, मात्र त्या कलेचा आशय खऱ्या अर्थाने अजून सर्वसामान्यांपर्यंत पोचणे बाकी आहे. एक दिवस तो नक्कीच सगळ्यांच्या मनात झिरपेल. तेव्हाच भारंभार छायाचित्रे न काढता मोजकी व दर्जेदार छायाचित्रे काढली जातील व तेव्हाच ज्यांनी छायाचित्रकला बंदिस्त न ठेवता जगास अर्पण केली त्यांना ती खरी मानवंदना असेल. मंगेश पांडुरंग निमकर, कळवा
-------------------------------------------------------

नेमक्या शब्दसौष्ठवाने नटलेला लेख
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘झी मराठी दिशा’च्या अंकातील आदेश बांदेकर यांच्याविषयी अविनाश चंदने यांनी लिहिलेला ‘आनंदाचे झाड’ हा लेख वाचला. तो खूप आवडला. आदेशजी आणि सुजाण मराठी रसिकांच्या ऋणानुबंधातील एक सहजसुंदर आलेख नेमक्या शब्दसौष्ठव आणि भाषाशैलीमुळे अधिक परिणामकारक आणि प्रभावी झाला आहे. एका चांगल्या ‘आनंदाच्या झाडा’बद्दल अभिनंदन! 
- प्रा. डॉ. सुहास उगले, अकोला
-------------------------------------------------------

उपक्रमाला मिळाली नवीन दिशा
माझ्या ‘रद्दीतून ग्रंथालय’ उपक्रमाला पाहिजे तेवढी माहिती उपलब्ध होत नव्हती. अनेक वृत्तपत्रे वाचल्यानंतर थोडी माहिती मिळत होती, मग ती गोळा करून एखाद दुसरा प्रकल्प माझ्या उपक्रमात तयार होत होता. मात्र ‘झी मराठी दिशा’ हे आठवडा पत्र सुरू झाले आणि एक पर्वणी मिळाली.
माझ्या वाचन व कल्पनेचा उपयोग करून मनोरंजन, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजन, ऐतिहासिक, शैक्षणिक, क्रीडा, कला आदी विषयांवर प्रकाशित झालेल्या विविध प्रकारच्या सदरांमधील उपयुक्त अशा लेखांच्या साहाय्याने वेगवेगळे प्रकल्प बनविले आहेत. आपल्या दैनंदिन कामाबरोबर वर्तमानपत्र वाचता वाचता त्यामधील ज्ञानधन चिरंतन जतन करून ठेवण्याच्या छंदाला या आठवडापत्रामुळे बळकटी मिळाली. या आठवडापत्रामध्ये प्रसिद्ध होणारी विविध सदरे, अनेक विषयांवरील महत्त्वपूर्ण लेख, महान लेखक, कवी,  कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू अशा थोरांविषयीचे लेख व ज्ञान-विज्ञान, अध्यात्म, शिक्षण याबाबतचे लेख या ग्रंथसंग्रहात आहेत. आज शाळेत शिकवत असताना ‘झी मराठी दिशा’ची मदत होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे अध्यापन करताना रंजकपणा आला आहे.
२००५ पासून मी हा उपक्रम राबवत आहेत. आजपर्यंत ६०० च्या वर प्रकल्प बनवले आहेत. त्यात आज ‘झी मराठी दिशा’ भर घालत आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रकल्प बनवले. आज स्वत:चे वाचनालय बनवत आहे.
- कृष्णात दामोदर जाधव, चणेरा, ता. रोहा, जि. रायगड
-------------------------------------------------------

राजकारण्यांना पहिल्या पानावर जागा नको!
मी ‘झी मराठी दिशा’चा मागील दीड वर्षापासून वाचक आहे. या आठवडापत्रातील सर्व लेखक उत्तम आहेत. सर्वच लेखक चांगले आहेत, विशेषत: प्राजक्ता कशेळकर यांचे ‘वेचावे धन’ हे गुंतवणुकीबद्दलचे सदर चांगले असते, अमृता दुर्वे यांचे ‘टेक्नो टॉक’ तसेच मंगला मराठे यांचे ‘संकेत मिलनाचा’, शिरिषा साठे यांचे ‘चाकोरी’, अभय दातर यांचे ‘ग्राहकहिताच्या गोष्टी’, ‘सकला आणि जीवन’ सदरातील मुक्ता बर्वे यांचे लेख सुंदर असतात. त्यामुळे दर शनिवारी आम्हाला या अंकाची उत्सुकतेने वाट बघावी लागते. सर्व अंक उत्तम असला तरी काही सूचना काराव्याशा वाटतात. कृपया राजकारण्यांना पहिल्या पानावर अजिबात जागा देऊ नका. आम्हाला त्यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. मोदी काय करत आहेत, काँग्रेसचे काय चुकतेय, शिवसेना काय करते याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे राजकारणाशी निगडित बातम्या ‘झी मराठी दिशा’मध्ये अजिबात देऊ नका. मुलांचे मोबाइल, टीव्हीचे वेड कसे सोडवावे याबद्दलच्या लेखांची मालिका सुरू केल्यास फार बरे होईल.
- डॉ. सचिन कुलकर्णी, सोलापूर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link